जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:19 AM2019-08-28T00:19:23+5:302019-08-28T00:19:56+5:30

आदिवासी कॉलनी येथे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच ठाणेदार अशोक चौधरी, पोलीस उपनिरिक्षक सुरज तेलगोटे, बारवाल, आकाश चुंगडे, नरेंद्र कांबळे, विजय हरनुर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला.

The killing of one to dispel the old controversy | जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एकाची हत्या

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी एकाची हत्या

Next
ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार करून मारेकरी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक आदिवासी कॉलनी येथील रहिवासी असलेल्या राजू सुरेश उईके (३६) याला काही तरुणांनी जून्या वादाचा वचपा काढण्यासाठी धारदार शस्त्राने मारहाण करून त्याची हत्या केली. ही घटना आदिवासी कॉलनी भागातील शिवमंदिर समोर मंगळवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास घडली. मारहाण केल्यानंतर राजूच्या मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
आदिवासी कॉलनी येथे एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच ठाणेदार अशोक चौधरी, पोलीस उपनिरिक्षक सुरज तेलगोटे, बारवाल, आकाश चुंगडे, नरेंद्र कांबळे, विजय हरनुर यांनी घटनास्थळ गाठून मृतदेत ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. राजू उईके याची हत्या काही तरुणांनी जून्या वादाचा वचपा काढण्यासाठी केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सूरू होती.

आरोपीच्या शोधार्थ दोन चमू रवाना
राजू उईके याची हत्या कुणी केली असावी याचा अंदाज आल्यानंतर ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिसांची दोन चमू रवाना करण्यात आल्या आहेत. शिवाय या चमूकडून काहीजणांना ताब्यात घेऊन चौकशीही केली जात असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर पोलीस सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली.

Web Title: The killing of one to dispel the old controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून