हिंगणघाट येथे लवकरच काझीपेठ-पुणे एक्सप्रेसचा थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 11:52 PM2017-10-29T23:52:28+5:302017-10-29T23:52:44+5:30

काझीपेठ -पुणे एक्सपे्रसला हिंगणघाट येथे थांबा मिळणे आता निश्चित झाले आहे.

Kishipeth-Pune Express stop at Hinganghat soon | हिंगणघाट येथे लवकरच काझीपेठ-पुणे एक्सप्रेसचा थांबा

हिंगणघाट येथे लवकरच काझीपेठ-पुणे एक्सप्रेसचा थांबा

Next
ठळक मुद्देसमीर कुणावार यांच्या प्रयत्नांना यश : प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : काझीपेठ -पुणे एक्सपे्रसला हिंगणघाट येथे थांबा मिळणे आता निश्चित झाले आहे. या थांब्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आ. समीर कुणावार यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे आता या गाडीला हिंगणघाट येथे थांबा मिळणार असून येथील प्रवाशांना सुविधा मिळणार आहे.
केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून गत अनेक वर्षांपासूनची मागणी असलेली काझीपेठ-पुणे एक्सपे्रस गत आठवड्यात सुरू झाली. परंतु हिंगणघाट येथे या गाडीला थांबा देण्यात आला नाही. यामुळे येथून प्रवास करणाºयांत कमालीचा रोष निर्माण झाला होता. या गाडीला येथे थांबा मिळण्याकरिता विविध सामाजिक संघटनांनी रेल्वेस्थानकावर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला होता.
या नव्या रेल्वेगाडीचा थांबा मिळण्यासाठी येथील आ. कुणावार यांना विविध सामाजिक संघटनांच्यावतीने तसेच शहरवासियांच्यावतीने निवेदने सुद्धा देण्यात आली. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आ. कुणावार यांच्याकरिता ही बाब प्रतिष्ठेची बनली. त्यांनी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांची भेट घेवून पुणे एक्सपे्रसला हिंगणघाट येथे थांबा मिळण्याकरिता पत्र दिले. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी येथे थांबा देण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यांनी रेल्वे मंत्रालयाला या गाडीचा हिंगणघाट येथे थांबा देण्यासंबंधी कार्यवाही करण्याची निर्देश दिले. अखेर रेल्वे प्रशासनाने थांब्याकरिता हिरवी झेंडी दिली असून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आ. कुणावार यांनी दिली. तसेच सदर साप्ताहिक गाडी नियमित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. गाडीचा थांबा कोणत्या दिवसापासून येथे सुरू होतो, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

Web Title: Kishipeth-Pune Express stop at Hinganghat soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.