किशोर कृपलानीचे अतिक्रमण पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:42 PM2018-12-03T22:42:00+5:302018-12-03T22:43:10+5:30

येथील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या किशोर कृपलानी यांच्याकडून सध्या स्थानिक मेन रोड मार्गावर केसरीमल कन्या शाळेसमोर बांधकाम केले जात आहे. सुरू असलेले हे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवून ते तात्काळ बंद करण्याचा नोटीस न.प. प्रशासनाने किशोर कृपलानी यांना बजावला आहे. असे असतानाही सदर बांधकाम सुरू असल्याने व नोटीस बजावल्याच्या एक महिन्याच्या आत न.प.च्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास किशोर कृपलानी यांच्यावर न.प. प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.

Kishor Kripalani's encroachment | किशोर कृपलानीचे अतिक्रमण पाडणार

किशोर कृपलानीचे अतिक्रमण पाडणार

Next
ठळक मुद्देकामबंद करण्याची नगर पालिकेने बजावली नोटीस : गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : येथील मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या किशोर कृपलानी यांच्याकडून सध्या स्थानिक मेन रोड मार्गावर केसरीमल कन्या शाळेसमोर बांधकाम केले जात आहे. सुरू असलेले हे बांधकाम अवैध असल्याचा ठपका ठेवून ते तात्काळ बंद करण्याचा नोटीस न.प. प्रशासनाने किशोर कृपलानी यांना बजावला आहे. असे असतानाही सदर बांधकाम सुरू असल्याने व नोटीस बजावल्याच्या एक महिन्याच्या आत न.प.च्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यास किशोर कृपलानी यांच्यावर न.प. प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा शहरातील नव्हे तर जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित व्यावयायिक म्हणून किशोर कृपलानी यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी सध्या स्थानिक मेन रोड वरील केसरीमल कन्या शाळे समोरील जागेवर साई नामक हॉटेल बांधकाम सुरू केले आहे. सदर बांधकाम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम झटपट पूर्ण केले जात आहे. कृपलानी यांच्याकडून केल्या जात असलेले हॉटेलचे बांधकाम नियमांना डावलून होत असल्याचे लक्षात येताच सुरूवातीला न.प.च्या अधिकाऱ्यांनी कृपलानी यांना तोंडी सूचना दिल्या. परंतु, त्यावरही बांधकाम सुरूच राहिल्याने या होत असलेल्या बांधकामासाठी परवानगी घेतली काय याची शहानिशा करून कृपलानी यांनी नियमांना फाटा देत बांधकाम केल्याचा ठपका ठेवून पुढील बांधकाम बंद करण्याचा नोटीस वर्धा न.प. प्रशासनाने किशोर कृपलानी यांना २७ नोव्हेंबर २०१८ ला बजाविला आहे. विशेष म्हणजे नोटीस बजावल्याच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत नगर परिषद प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन जर कृपलानी यांनी केले नाही तर त्यांच्यावर न.प. प्रशासन फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे न.प.तील अधिकाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे कृपलानी यांनी वाहनतळासाठी जागा सोडलेली नाही. शिवाय साईड स्पेसींगच्या जागेवर अवैध पक्के बांधकाम केले असल्याचे पालिका अधिकारी व कर्मचाºयांनी केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. आता पुढे काय होते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.
बांधकाम नियमानुकुल करण्यासाठी दंडही भरता येणार नाहीच
नवीन बांधकामासाठी नुकताच उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्यामुळे कृपलानी यांना दंड भरून सदर बांधकाम नियमानुकुल करता येणार नाही. कृपलानी यांच्याकडे अवैध बांधकाम पाडणे व नियमानुसार परवानगी घेवून बांधकाम करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे न.प.तील अधिकाºयांनी सांगितले.
जुने रहिवासी कारणासाठी परवानगी
ज्या जागेवर किशोर कृपलानी यांच्याकडून हॉटेलसाठी बांधकाम केले जात आहे. त्या जागेवर वर्धा न.प. प्रशासनाकडून जुने रहिवासी कारणासाठी परवानगी देण्यात आली होती. परंतु, सध्या कृपलानी यांच्याकडून ७०० चौ.मि. जागेवर तीन मजली एकूण २ हजार १०० चौ. मि. मध्ये सुमारे ७० टक्के बांधकाम अवैध पद्धतीनेच करण्यात आले आहे. न.प.च्या बांधकाम बंद करण्याच्या नोटीस नंतरही कृपलानी यांच्याकडून सध्या झटपट उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याचा सपाटा सुरू असल्याचे बघावयास मिळते.
फाईलही गहाळ
न.प.च्या काही अधिकाऱ्यांनी सूरूवातीला कृपलानी यांना मौखिक सूचना दिल्या. त्यावेळी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, शोध घेऊन आणि सदर प्रकरणी न.प.तील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत एकतर बांधकाम परवागीसाठी अर्जच आला नाही. अर्ज आला असेल तर ती साई एन्टर प्राईजेसची सुरूवातीची बांधकाम परवानगीची फाईलच बांधकाम विभागातून गहाळ झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याने झरीतील शुक्राचार्य कोण अशी चर्चा सध्या न.प.तील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
पार्किंगसह साईड मार्जींगसाठी जागाच सोडली नाही
केसरीमल कन्या शाळेसमोर सुरू असलेल्या अवैध बांधकामाच्या पाहणी दरम्यान बांधकामाबाबतच्या अनेक नियमांना कृपलानी यांना फाटाच दिल्याचे निदर्शनास आले. सदर बांधकाम करताना वाहनतळासाठी तसेच साईड मार्जींगसाठी नियमानुसार जागा सोडणे क्रमप्राप्त होते. परंतु, किशोर कृपलानी यांनी सदर विषयाला अनुसरून जागाच सोडली नाही. उल्लेखनिय म्हणजे साईड मार्जींगच्या जागेवर दोन जीने (पक्क्या पायऱ्या) तयार केले आहे. इतकेच नव्हे तर न.प. प्रशासनाकडून बांधकाम परवानगी न घेता थेट मनमर्जीने बांधकामाला सुरूवात केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना न.प. प्रशासनाने नोटीस बजावला आहे.

सदर जागेवर हॉटेलचा नकाशा तयार करून तो न.प. कडून मंजूर करून घेतला आहे. शिवाय बांधकाम परवानगीही घेतली आहे. बांधकाम परवानगी नुसार २०१६ मध्येच बांधकाम पूर्ण केले आहे. आता सुरू असलेले काम सजावट आणि फिनिशींगचे होत आहे. काही कारणास्तव २०१६ नंतर बांधकाम थांबले होते. वर्धा न.प.चा काम बंद करण्याचा नोटीस प्राप्त झाला आहे. सध्या जिल्ह्याबाहेर असल्याने वर्धेत येताच बुधवारनंतर न.प.च्या नोटीसचे लेखी उत्तर न.प. प्रशासनाला देणार आहे.
- किशोर कृपलानी, व्यावसायिक, वर्धा.

न.प. प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम रावून गरिबांचे अतिक्रमण काढते. परंतु, याच प्रशासनाला मला न. प. कार्यालयापासून अवघ्या काही मिटरवर असलेल्या किशोर कृपलानी या धनदांडग्या व्यावसायिकाकडून करण्यात आलेले अवैध बांधकाम निदर्शनास आणून द्यावे लागले. न.प. मुख्याधिकाºयांनी आता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून किशोर कृपलानी यांना काम बंद करण्याचा नोटीस बजावली आहे. शहरातील अवैध बांधकामांचे विषय यानंतरही लावून धरणार आहे. कृपलानी यांच्यावर कठोर कारवाई व सदर अवैध बांधकाम तूटेपर्यंत हा लढा कायम ठेवू.
- सुरेश पट्टेवार, अध्यक्ष शिवा संघटना, वर्धा.

कृपलानी यांनी नियमांना डावलून बांधकाम केल्याने व उर्वरित काम सुरू असल्याने त्यांना आम्ही २७ नोव्हेंबरला सदर काम बंद करण्याबाबत नोटीस बजावला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार कृपलानी यांना दंड भरून सदर नवीन बांधकाम नियमानुकुल करता येत नाही. त्यांच्याकडे एकच पर्याय शिल्लक आहे, तो म्हणजे अवैध बांधकाम पाडून रितसर बांधकाम परवानगी घेवून बांधकाम करणे. पालिकेकडून देण्यात आलेल्या सुचनांकडे पाठ दाखविल्यास व्यावसायिक किशोर कृपलानी यांच्यावर आम्ही नोटीस बजावल्याच्या तारखेच्या ३० दिवसानंतर फौजदारी गुन्हा दाखल करू.
- दिनेश नेरकर, नगररचनाकार,
न.प. वर्धा.

Web Title: Kishor Kripalani's encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.