टाकाऊ वस्तूंपासून प्रज्वलने बनविला कुलर

By admin | Published: May 10, 2014 12:28 AM2014-05-10T00:28:51+5:302014-05-10T00:28:51+5:30

येथील मॉडेल हायस्कूलमधील वर्ग सातवीतील प्रज्वल विनोद ठाकरे याने आपला वैज्ञानिक छंद जोपासत टाकवू वस्तुपासून कुलर बनविला़

Koller, made from burning things | टाकाऊ वस्तूंपासून प्रज्वलने बनविला कुलर

टाकाऊ वस्तूंपासून प्रज्वलने बनविला कुलर

Next

 फनिंद्र रघाटाटे - रोहणा

येथील मॉडेल हायस्कूलमधील वर्ग सातवीतील प्रज्वल विनोद ठाकरे याने आपला वैज्ञानिक छंद जोपासत टाकवू वस्तुपासून कुलर बनविला़ या कुलरला त्याने विज्ञान प्रदर्शनात ठेवले असता त्याची वाहवाही झाली. पण एवढ्यावरच न थांबला तोच कुलर आज प्रज्वलने आपल्या किराणा दुकानात ठेवला असून तो ग्राहकांना ग्राहकांना थंड हवा देत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रज्वल सतत आसपासच्या वस्तूंपासून काही ना काही बनवित असतो. हाच छंद जोपासत त्याने परिसरातील टाकाऊ वस्तू वापरून कुलर बनविण्याचा निश्चय केला. यासाठी प्रज्वलने खर्डे, सूत, बारिक तार, जूनी बॅटरी व पाते तयार करण्यासाठी प्लास्टिक भिंगरी असे टाकवू साहित्य वापरून प्लास्टिक डब्याचा कुलर तयार केला़ या उपक्रमात त्याला जयदीप कडू या मित्राचेही सहकार्य लाभले. आपला प्रयोग केवळ प्रयोग म्हणून न ठेवता त्याने तो उपयोगातही आणला. सध्या त्याचा कुलर त्याच्या वडिलांच्या दुकामात दिमाखाने मिरवित आहे. ग्राहकही येताना काही क्षण गार वारा घेत प्रज्वलच्या कुलरचे कौतुक करतात. यासाठी त्याला शाळेचे प्राचार्य ठाकरे, पर्यवेक्षक काकडे, शिक्षक वर्ग आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Koller, made from burning things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.