भक्ती संगीतातून रंगली ‘कृष्णमयी राधा’
By admin | Published: September 5, 2015 01:57 AM2015-09-05T01:57:23+5:302015-09-05T01:57:23+5:30
‘कृष्णमयी राधा’ या भक्ती संगीत कार्यक्रमाच्या सुरेल व बहारदार सादरीकरणाने श्रोते मंत्रमुध झाले.
वृद्धाश्रमातील कार्यक्रम : विद्यार्थ्यांनी दिली संगीतमय मेजवानी
वर्धा : ‘कृष्णमयी राधा’ या भक्ती संगीत कार्यक्रमाच्या सुरेल व बहारदार सादरीकरणाने श्रोते मंत्रमुध झाले. स्थानिक मातोश्री वृद्धाश्रम येथे दुर्गा म्युझीक क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी वृद्धजणांना एक अनोखी अनुभूती या माध्यमातून दिली.
गुरूवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मातृ सेवा संघाच्या अध्यक्ष पूष्पमाला देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत झाडे, सिंधू साबळे याची उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी गणेश स्तवन सादर करुन कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर ‘साधी-भोळी मीरा’ हे गीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. यासह कृष्णकन्हैय्या कसा सगळ्यांना वेड लावतो असे भाव व्यक्त करणारे ‘नंदकिशोर चित्त चकोर’ हे गीत सादर केले. यानंतर कृष्णाच्या लीला एकाहून एक असे सरस व भावपूर्ण गीतातून मांडल्या.
वर्षा बोकाडे यांनी ‘कृष्णा माझ्याकडे पाहू नको’ हे गीत सादर केले. वंदना खंडाळकर यांनी ‘अग नाच नाच राधे उडवू या रंग’ हे गीत सादर करुन उपस्थितांना थिरकविले. प्रभा पावडे यांनी ‘शाम तेरी बंसी’ हे गीत सादर केले तर लता मुरडीव यांनी ‘राधा कृष्णा वरी भाळली’ हे गीत सादर करुन शास्त्रीय गायकी पेश केली. प्रतिमा परांजपे यांनी मुकुंदा ‘रुसु नको इतुका’ हे पद गायले. रुसलेल्या कृष्णाला आळवण्याचा भाव यातून दिसला. माणीक टापले, जयश्री समुद्रे यांनी ‘वृंदावनी वेणू वाजे’ हे पद गाऊन रसीकांची मने जिंकली.
वेणूच्या नादाने वृंदावनातील सर्व वैर भाव विसरले होते. वैराभाव विसरुन कृष्णमय वातावरण निर्माण झाले होते. वर्षा काकडे व सरोज भोसकर यांच्या अनुक्रमे ‘किती सांगू मी सांगू कुणाला’ व ‘आज गोकूळात रंग खेळतो हरी’ या गाण्याने वृद्धांना फेर धरालया लावला. कांचन दापूरकर यांनी ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’ हे पद सदर केले. सुहास कुऱ्हेकर यांनी यांच्या ‘हातीचा वेणू घ्या गं’ हे पद गायले. लहा डगवार यांनी नेवू ‘नको माधवा अक्रुरा’ हे गीत सादर केले. मेघा देसाई हरी नामे मुखी रंगले हे गीत गाईले. शेवटी प्रतिमा यांच्या ग्रुपने राधे चल माझ्या गावाला जाऊ या गौवळ गायली.
‘मधुबन मे जो कन्हैया किसी गोपीसे मिले’ या गाण्यावर नृत्य सादर केले. संचालक श्रीकांत झाडे यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले. संचालन जयश्री सराफ यांनी केले तर आभार वणीता देशपांडे यांनी मानले. यावेळी परिसरातील गणमान्य व्यक्ती, वृद्धाश्रमाचे कर्मचारी व ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)