कृपलानीची उत्तरे पालिकेला पोहोचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 10:16 PM2019-02-23T22:16:08+5:302019-02-23T22:17:08+5:30

केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंनी केलेल्या बांधकामासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर आता कृपलानी बंधूंनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटिशीचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरात कृपलानी यांनी बांधकामाला २०१२ मध्येच परवानगी देण्यात आली होती, असा दावा केला आहे.

Krupalani's answers reached the municipality | कृपलानीची उत्तरे पालिकेला पोहोचली

कृपलानीची उत्तरे पालिकेला पोहोचली

googlenewsNext
ठळक मुद्देदोन वर्षांपासून निर्णय नाही । म्हणे, परवानगी मिळाली समजलो

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूंनी केलेल्या बांधकामासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर आता कृपलानी बंधूंनी नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटिशीचे उत्तर सादर केले आहे. या उत्तरात कृपलानी यांनी बांधकामाला २०१२ मध्येच परवानगी देण्यात आली होती, असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पालिका प्रशासन काय भूमिका घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. कृपलानी यांच्यावतीने विक्रम अशोक कृपलानी यांनी ७ फेब्रुवारी २०१९ ला मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून यात त्यांनी वॉर्ड क्र.४ मधील घर क्र. २०७५, २०७६ वरील बांधकाम हे अवैध, परंतु सर्व परवानगी मिळण्याबाबत आमच्या बाजूने वेळोवेळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, असे म्हटले आहे. प्लॉट क्र .१३०७ हा काका किशोर कृपलानी यांच्या नावे होता. त्यांनी प्लॉटवर बांधकामाकरिता अर्ज केला होता. त्यानंतर बांधकामाबाबत २ मे २०१४ ला परवानगी देण्यात आली होती. प्लॉट क्र. १३०८ हा काकू पूनम किशोर कृपलानी यांच्या नावे होता. त्या प्लॉटवर बांधकामासाठी १७ एप्रिल २०१२ ला परवानगी देण्यात आली होती. तसेच हा प्लॉट रहिवासी आणि व्यवसायाकरिता नमूद करीत प्लॉटचे एकत्रिकरण करून बांधकाम करण्याबाबत नकाशासह २६ फेब्रुवारी २०१६ ला बांधकाम नूतनीकरण करण्याबाबत अर्ज केला होता. २६ फेब्रुवारीला अर्ज करूनही २७ नोव्हेंबर २०१८ पर्यंत कुठलाही आक्षेप आलेला नाही. मालमत्ता क्रमांक १३०७ हा विक्रम कृपलानी व संदीप कृपलानी यांना काकांनी बक्षीसपत्रावर दिला आहे. तसेच १३०८ ही मालमत्ता पूनम यांनी अशोक कृपलानी यांना दिली आहे. या उत्तरात विक्रम कृपलानी याने म्हटले आहे की, १३०७ व १३०८ ह्या दोन्ही मालमत्ता एकत्रित समजून यावर बांधकाम झाले. त्यामुळे कुठल्या अडचणी असल्यास कळवावे, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. हॉटेलबाबत नगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यावर नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर हॉटेलसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले, असा दावा विक्रम कृपलानी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी उत्तरात केलेला आहे. बांधकाम नूतनीकरणाबाबत विनंती अर्ज केला, परंतु दोन वर्षांत पालिकेने कुठलेही निर्देश दिले नाहीत. यामुळे बांधकाम मंजूर आहे असे समजून मी युनियन बँक आॅफ इंडिया यांच्याकडून कर्ज घेऊन बांधकाम केले आहे. हे बांधकाम नियमित करावे, असेही या पत्रात कृपलानी यांनी म्हटले आहे. वर्धा नगर पालिकेच्या प्रशासनाने कृपलानी यांच्या बांधकामावर आजतागायत कोणतीही कारवाई केलेली नाही. या लेखी उत्तरानंतर पालिका प्रशासन काय कारवाई करते, हे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Krupalani's answers reached the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा