कर्तबगार पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:07 PM2019-04-18T22:07:48+5:302019-04-18T22:08:11+5:30
जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच महत्वाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी बजावणाºया पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पाठ थोपटली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच महत्वाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविणाऱ्या आणि लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी पाठ थोपटली. तसेच त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित केले.
स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेत गुन्हे सभा पार पडली. या सभेत कर्तृत्ववान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. तसेच रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादीना फसवणुकीची ३ लाख ६० हजार रुपयाची रक्कम न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता दिल्लीत जाऊन आरोपींना बेड्या ठोकत यशस्वी कामगिरी केल्याबद्दल रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राम्हणे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस हवालदार सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे, अनुप कावळे, छाया तेलगोटे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. दर महिन्यात पोलिस विभागातर्फे हा उपक्रम राबविला जातो. पोलिस अधीक्षकांच्या हस्ते गौरव करण्यात येत असल्याने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचाविण्यास मदत होत आहे. यामुळे गुन्ह्याच्या तपासाचे प्रमाण वाढण्यास मदत होत असून पोलिस यंत्रणा सजग होऊन काम करीत आहे.
व्हीआयपीच्या सभांच्या नियोजनाकरिता पोलिसांना मिळाले प्रशस्तीपत्र
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये वर्धा शहर येथे महत्वाचे व्यक्तींच्या दौरा कार्यक्रमाच्या वेळी बंदोबस्ताची उत्कृष्ट आखणी करून नियोजनपर बंदोबस्त लावल्याबाबत त्यांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देण्यात आले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे सुनील दहीभाते, भास्कर भूल, संतोष बावनकुळे, सरोज पाली, विजय कडू, प्रमोदिनी ढोडरमल, प्रियांका वैद्य, सीमा धोंगडे तसेच मतदानादरम्यान संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील एकूण १३३१ मतदान केंद्रांवर नियोजनबद्धरीत्या उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करून उत्कृष्ट बंदोबस्त लावला. त्याकरिता सुनील दहीभाते, राममीलन साहू, आनंदमंगल बाजपेयी, रमेश कोकेवार, शंकर मोहोड, मनोज चैधरी, रणजित यादव, रमेश केवटे, जानराव ठोंबरे, निर्भय कुंवर, निशीतरंजन पांडे, प्रदीप कदम, आशा जनकवार, किरण नागोसे, सपना कांबळे, रूपाली टेकाम, शेख इरफान शेख चांद व किरण कुरटकार यांनाही सन्मानित करण्यात आले.
रामनगरच्या ठाणेदारांचा विशेष सन्मान
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान रामनगर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाºयांनी महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौऱ्या दरम्यान सभास्थळी असलेल्या बंदोबस्ताची उत्कृष्ट आखणी, नियोजन केल्यामुळे रामनगरचे ठाणेदार अशोक चौधरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हद्दपार करणाऱ्या पोलिसांचाही गौरव
सन २०१८ मध्ये जिल्ह्यात प्रभावी प्रतिंबंधक कार्यवाहीअंतर्गत २ दारुविके्रत्यांवर एम.पी.डी.ए. कार्यवाही, लोकसभा निवडणूक दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये तीन प्रकरणांमध्ये एकूण ८ समाजकंटक तसेच दारुविक्रेते असे एकूण ३८ जणांना हद्दपार करण्यात आले. याकरिता उत्कृ ष्ट कामगिरी केल्याबद्दल संजय खल्लारकर व ज्योत्सना शेळके यांना सन्मानित करण्यात आले.