प्रगत समाजाला पडतो ‘अन्न हे पूर्णब्रह्म’चा विसर
By admin | Published: March 29, 2015 02:10 AM2015-03-29T02:10:10+5:302015-03-29T02:10:10+5:30
लग्न सोहळा असो वा कोणता कार्यक्रम यात जेपणावळी आल्याच. आज मात्र या जेवणावळीचे स्वरुप बदलत आहे.
पिंपळखुटा : लग्न सोहळा असो वा कोणता कार्यक्रम यात जेपणावळी आल्याच. आज मात्र या जेवणावळीचे स्वरुप बदलत आहे. पूर्वी बसणाऱ्या पंगती कमी झाल्या असून त्याची जागा बुफे पद्धतीने घेतली आहे. ही पद्धतही काही वाईट नाही; मात्र यातून गैरसमजामुळे निर्माण होत असलेल्या प्रकारामुळे अन्नचा अपमाण होत आहे. प्रगत समाजाची ओळख बनू पाहत असलेल्या या पद्धतीमुळे ‘अन्न पूर्णब्रह्म’चा विसर पडत आहे. कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळाच्या मागे वा जागा असेल तिथे अन्नाचे ढिग लावल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
एका लग्न प्रसंगात सरासरी एक ते दोन हजार लोक हजर असतात. बुफे पद्धतीमुळे रांग लावून ताट वाढून घेण्याचा त्रास वाचविण्यासाठी अनेक जण ताटात गरजेपेक्षा जास्त वाढून घेतात. लहान मुलांच्या ताटातही सर्व पदार्थ वाढून घेतले जातात. प्रत्यक्षात ताटातील बरेचसे अन्न वाया जाते. एक प्रसंगात किमान १५० लोकांचे अन्न वाया जाते.
उकिरड्यावर हे अन्न फेकून याची विल्हेवाट लावली जाते. उकीरड्यावर फेकलेले अन्न सडल्यामुळे त्यातून मिथेन या घातक वायुची निर्मिती होते. ग्लोबल वार्मिंग तसेच वातावरणातील बदलास ही नासाडी एका प्रकारे कारणीभुत ठरत असल्याचे दिसून येते. अन्न हे पूर्णबह्म आहे, असे म्हणाऱ्या भारत देशातच अनेकांना रात्री उपाशीपोटी झोपावे लागत आहे. अशातही होणारी अन्नाची नासाडी ही त्याचा विपर्यास दर्शविणारी आहे. ताटातील उस्टे अन्न उकीरड्यावर टाकून दिल्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो. अन्न उश्टे न टाकता योग्य वापर केल्यास अन्नपूर्णादेवीचा सन्मान होतो हे समजणे गरजेचे आहे. गरीब व्यक्ती आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. त्याच देशात ५८ हजार कोटी रुपयांचे अन्न फेकुन दिल्या जाते ही खरतर शरमेची बाब आहे.
एका जेवणात १ हजार २३९ कैलरीज असतात जी कुपोषित बालकांच्या दिवसभराच्या उर्जेची गरज भागवू शकतात, मात्र लग्नातील प्रत्येक ताटातील २० टक्के जेवण म्हणजे २४६ कॅलरीज अन्न फेकून दिल्या जात आहे.(वार्ताहर)