‘झेडपी’ समोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:32 PM2018-10-22T23:32:24+5:302018-10-22T23:32:39+5:30
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी स्थानिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वा धरणे आंदोलन केले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाºयांना सादर करण्यात आले.
आरोग्य पर्यवेक्षक या पदावर आरोग्य सहायक (पुरूष) व आरोग्य सहायक (महिला) या संवर्गातील पदोन्नती करावी. आरोग्य कर्मचाºयांना दुसरा व चौथा शनिवारी सुट्टी देण्याचा शासन निर्माण काढण्यात यावा. २६ जानेवारीच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात आरोग्य कर्मचाºयांचा समावेश करावा. शासन निर्णय ६ आॅगस्ट २००७ च्या आकृतीबंधानुसार मंजूर असलेली पं.स. कार्यालयातील उपकेंद्र स्तरावरील, जिल्हास्तरावरील आरोग्य सेवक, आरोग्य सहायक, आरोग्य पर्यवेक्षक या पदावर मंजूर असलेल्या पदांची बिंदुनामावली करून पदे भरण्यात यावी. लेखाशिर्ष २२११ च्या मंजुरी पदांची बिंदुनामावली करून पदे भरावे. दिव्यांग बांधवांना नियमानुसार भरती व पदोन्नती मिळण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिलीप उटाणे, सिद्धार्थ तेलतुंबडे, दीपक कांबळे, वंदना उईके, रतन बोंडे यांनी केले. आंदोलनात सुनीता रेवडे, तारा भोंगाडे, गिता बकाने, कविता झामरे, राजेंद्र धरमठोक, अविनाश चव्हाण, अमित कोपुलवार, ममता लोखंडे, माया राऊत, आशा धुर्वे, हराळे आदी हजर होते.
५ नोव्हेंबरला बैठक
आंदोलनकर्त्यांचे निवेदन जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी स्विकारले. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याबाबत जि.प.प्रशासन गंभीर आहे. त्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी जुकाअ यांच्या कक्षात संघटना प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांनी बैठक ५ नोव्हेंबरला घेण्यात येईल असे आश्वासन याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिले.