विद्युतरोधक साहित्याचा अभाव कर्मचाऱ्यांच्या जीवावर

By admin | Published: May 30, 2017 01:10 AM2017-05-30T01:10:23+5:302017-05-30T01:10:23+5:30

सध्या पावसाळ्याचे दिवस येत आहेत. या दिवसात सुटलेल्या वाऱ्यामुळे व तुफान पावसामुळे विजेचा पुरवठा वेळीअवेळी खंडित होतो.

Lack of insulator material on the life of the employees | विद्युतरोधक साहित्याचा अभाव कर्मचाऱ्यांच्या जीवावर

विद्युतरोधक साहित्याचा अभाव कर्मचाऱ्यांच्या जीवावर

Next

फाटके हातमोजे : फ्युज टाकण्याकरिता नसतो तार
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : सध्या पावसाळ्याचे दिवस येत आहेत. या दिवसात सुटलेल्या वाऱ्यामुळे व तुफान पावसामुळे विजेचा पुरवठा वेळीअवेळी खंडित होतो. यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री तो दुरूस्त करण्याकरिता जावे लागते. विभागात असे जिकरीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे विद्युुतरोधक साहित्य नसल्याने त्यांचा जीव धोक्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना साहित्य पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे.
महावितरणच्या तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांना विजेची दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या धोकादायक झाल्या असल्याचे निदर्शनास आल्या आहेत. या वीज कर्मचाऱ्यांकडे साधा फ्युज तारही नाही. वेळेळवर मिळेल त्या ताराचा उपयोग करून ते वेळ निभावून घेत असल्याने या कर्मचाऱ्याच्या जीवाशी कंपनीला काही घेणे देणे नसल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात असलेल्या रोहित्राच्या पेट्या सताड उघड्या असतात. त्या सभोवताल गवत व झुडपे वाढलेली आहेत. ही झुडपे काढण्याची मोहिम कंपनीच्यावतीने राबविण्यात आली; मात्र ती कुठे दबली हे कळायला मार्ग नाही.
या कर्मचाऱ्यांकडून फ्युज ऐवजी सरळ तारच टाकण्याची पद्धत अंवलंबिली जाते. ही दुरूस्ती करताना कर्मचाऱ्यांना हातात घालायला खरी हातमोजे, पायात लांब जोडा, टॉर्च व किरकोळ साहित्य नसल्याचे दिसून आले आहे. पूर्वी मिळत असलेले साहित्य आता देणे कंपनीने टाळणे सुरू केल्याचे यावरून दिसत आहे.

हातमोजे नसल्याने धोका
सेलू तालुक्यात नादुरूस्त पुरवठा सुरळीत करण्याकरिता रोहित्रावर दुरुस्तीचे काम सुरू असताना फाटक्या हातमोज्यामुळे मेश्राम नावाच्या वीज कर्मचाऱ्यास विजेचा धक्का बसला. ही घटना शनिवारी घडली. हा प्रकार तेथे उपस्थित सामाजिक कार्यकर्ते ब्रिजकिशोर मिश्रा यांनी पाहिला.

दोन दिवसापूर्वी हातमोजे व इतर साहित्य आले आहे. ते काही कर्मचाऱ्यास दिले. येत्या दोन दिवसात सर्वांना वाटप करण्यात येईल. तसेच डीपीखालील झुडपे साफ केल्या जाईल.
- संजय पुरी, उपकार्यकारी अभियंता, वीजवितरण कंपनी, सेलू

Web Title: Lack of insulator material on the life of the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.