पाण्याच्या टाकीतून लाखो लीटर पाण्याची नासाडी
By admin | Published: March 16, 2017 12:47 AM2017-03-16T00:47:54+5:302017-03-16T00:47:54+5:30
पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे.
जीवन प्राधिकरणचा गलभान कारभार : नगराध्यक्षांनी केली संबंधीत विभागाची कानउघाडणी
आर्वी : पाण्याच्या जपून वापर करावा, यासाठी शासनस्तरावर जागृती मोहीम राबविण्यात येते. यावर लाखो रूपये खर्च करण्यात येत आहे. मात्र जीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे येथील पाण्याच्या टाकीतून दिवसाला लाखो लीटर पाण्याच्या अपव्यय होत आहे. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे यांंनी संबंधीत विभागाची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे.
पाण्याचा अपव्यय होत असताना याकडे जीवन प्राधिकरण विभाग लक्ष देण्यास तयार नाही. नागरिकांनी अनेकदा ही बाब लक्षात आणुन दिली. तरीही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून आले. दरम्यान नगराध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे हे दररोज सकाळी शहराचा फेरफटका मारतात. या माध्यमातून ते नागरिकांच्या समस्या जाणुन घेतात. शहरात फेरफटका मारत असतात त्यांना जनतानगर येथे पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून आले. येथील पाण्याच्या टाकीतून आर्वी शहराला पुरवठा होतो. पाणी टाकी भरल्यावर पाणी पुरवठा सुरूच असतो. हा प्रकार तीन ते चार वर्षापासून सुरू असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या संदर्भात नगराध्यक्ष प्रा. सव्वालाखे यांनी आर्वीतील जीवन प्राधिकरण विभागाशी संपर्क साधून ही समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी चर्चा केली. तसेच चार वर्षापासून हा प्रकार सुरू असताना उपाययोजना न केल्याने कानउघाडणी केली. जनतानगराच्या येथील पाण्याच्या टाकीची १० लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. टाकी भरण्याकरिता तीन तास लागतात, मात्र पाण्याची मोटर सुरुच असते. त्यामुळे उर्वरीत पाणी टाकीतून रस्त्यावर वाहते. तक्रार करुनही संबंधीत विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे. उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)