नियोजनाचा अभाव; पावसाने शेत नेले खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 09:28 PM2020-06-18T21:28:51+5:302020-06-18T21:29:23+5:30

समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले.

Lack of planning; The rains swept away the farm | नियोजनाचा अभाव; पावसाने शेत नेले खरडून

नियोजनाचा अभाव; पावसाने शेत नेले खरडून

Next
ठळक मुद्देपेरलेले बियाणे मातीमोल : समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : तालुक्यात समुद्धी महामार्गाचे काम सुरु असून कंत्राटदाराने खोल नाल्या, मातीचे ढिगारे कायम ठेवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहे. परिणामी इटाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पेरलेले बियाणे खरडून नेले. लाख मोलाचे बियाणे मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत.
समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले. अशातच पहिल्याच पावसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उंच महामार्ग आणि पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नाले बंद केल्याने लगतच्या शेतात पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहेत. काही शेतातील नुकताच पेरलेले सोयाबीन, तूर व कपाशीचे बियाणेही वाहून गेले आहे. यामध्ये इटाळा येथील शेतकरी प्रमोद ढुमणे, विजय लंगडे, संजय लंगडे, नितीन हटवार, संजय तडस, दिनेश चांभारे, मंगेश चांभारे, अशोक वरटकर, हेमकांत वरटकर, रामू उमाटे, गंगाधर मुडे, सचिन ढुमणे, हितेश चांभारे, विलास लंगडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना सूचना दिल्यानंतर तलाठ्यांनी पाहणी करुन अहवाल तहसीलदारांकडे पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Lack of planning; The rains swept away the farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.