लाखो लिटर पाणी जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:48 AM2017-12-01T00:48:15+5:302017-12-01T00:48:33+5:30

रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही.

Lakhs of lit water wasted | लाखो लिटर पाणी जाते वाया

लाखो लिटर पाणी जाते वाया

googlenewsNext
ठळक मुद्देसदोष पाटचऱ्यांचा परिपाक : साफसफाई तथा दुरूस्तीकडे विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, पिकांऐवजी अन्य वनस्पतीचे संवर्धन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.
सेवाग्राम-हमदापूर मार्गाजवळून महाकाली धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तरोडा शिवार आणि मधे येणाºया गावांतील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या तरी कापसाचे उत्पन्न समाधानकारक नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघु पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचºयांबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. सखल भाग, खड्डे यातून पाणी भरून वाहत असल्याने पिकांपेक्षा रानगवताचेच संवर्धन होत असल्याचे खरांगणा गोडे परिसरात दिसून येत आहे. नादुरूस्ती पाटचऱ्या, उपकालव्यांमुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
निधीचे रडगाणे सुरूच
जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था सांभाळता यावी म्हणून पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक विभागातील प्रकल्प एकेका कार्यालयाला विभागून देण्यात आले. शिवाय कालवे विभागांचीही निर्मिती करण्यात आली; पण या विभागांना निधीच दिला जात नसल्याची ओरड तेथील अधिकारी करतात. परिणामी, कालवे, उपकालवे, पाटचऱ्यां यांची देखभाल, दुरूस्ती होत नसल्याचेच दिसून येत आहे. पाणी वापर संस्थाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नसून ते भलतीकडेच वाहून जात असल्याचे दिसते. हा प्रकार टाळणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Lakhs of lit water wasted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.