रेल्वेच्या दोन प्रकल्पांसाठी २९ गावात भूसंपादन पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:44 PM2018-08-27T22:44:13+5:302018-08-27T22:45:13+5:30
वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-नांदेड या नवीन रेल्वे मार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण २६ गावात तर वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी नऊ गावांपैकी तीन गावात भुसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे मार्गासाठी उर्वरित सहा गावांमध्ये झटपट भूसंपादनाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन विभागाकडून वेळोवेळी आढावा घेतल्या जात आहे.
वर्धा-नांदेड हा नवीन रेल्वे मार्ग नागरिकांसाठी फायद्याचा ठरणारा असल्याने या प्रकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्राचेच लक्ष लागले आहे. त्याबाबतची घोषणा झाल्यानंतर भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करीत सदर जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत होत प्रत्यक्ष कामाला कशी लवकरात लवकर सुरूवात करता येईल यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाच्या भुसंपादन विभागाने युद्धपातळीवर काम सुरू केले. अल्पावधीतच या विभागाने संपूर्ण २६ गावातील जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्या या प्रयत्नांना बºयापैकी यश आल्याचे दिसून येत आहे. तर वर्धा-बल्लारशाह या तिसºया रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यात एकूण नऊ गावातील जमीन संपादीत करणे क्रमप्राप्त आहे. त्यापैकी तीन गावातील जमीन संपादीत करण्यात आली आहे. शिवाय उर्वरित सहा गावातील जमीन संपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. सोमवारी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा प्रशासनातील भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांनी बैठक घेवून चर्चा केली. शिवाय काही भूसंपादनाचे प्रकरणांवर सकारात्मक चर्चेअंती तोडगा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनची प्रक्रिया मोजणीस्तरावर
वर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी वर्धा जिल्ह्यातील एकूण दहा गावांमध्ये जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. सध्या सदर प्रकल्पाचा विषय मोजणी स्तरावर आहे. लवकरच मोजणी पूर्ण करून जमिनीचे संपादन करीत ही दहा गावांमधील जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
तीन महिन्यांत होईल संपादनाची प्रक्रिया पूर्ण
रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी व संपादनाची प्रक्रिया पूर्ण करून ही जमीन रेल्वे विभागाकडे हस्तांतरीत केली जाणार आहे. राज्य शासन ही जमीन रेल्वे विभागाला हस्तांतरीत करणार असून ही संपूर्ण प्रक्रिया येत्या तीन महिन्यांमध्ये पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात आले.
अडचणींवर मात करण्याच्या सूचना
सदर चारही प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करण्यासंदर्भात येणाºया अडचणी तत्काळ दूर कराव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग व जलसंपदा विभागाच्या बैठकीत या सूचना मोजणी विभागाला देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
वर्धा-नांदेड या नव्या रेल्वे लाईनसाठी २६ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले आहे. वर्धा-बल्लारशाह या तिसऱ्या रेल्वे लाईनसाठी आतापर्यंत तीन गावातील जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. तर वर्धा-नागपूर या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया मोजणी स्तरावर आहे. यद्धपातळीवर हे काम होत आहे.
- चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी, भुसंपादन, वर्धा.