अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

By admin | Published: July 27, 2016 12:02 AM2016-07-27T00:02:13+5:302016-07-27T00:02:13+5:30

तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे.

The land of Manikwadas did not touch the farm due to beau | अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

अस्वलाच्या दहशतीने माणिकवाडावासी शेताकडे फिरकलेच नाही

Next

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू: दोन पिलांसह अस्वलाचा बुधलागड परिसरात धुमाकुळ
अमोल सोटे आष्टी (शहीद)
तालुक्यातील जंगलाने वेढलेले ३ हजार ५०० लोकवस्तीचे गाव माणिकवाडा. गावलगत असलेल्या जंगलात वाघासह अस्वलाचे वास्तव्याची गावकऱ्यांना माहिती आहे. तरीही हिंमतीने जंगलव्याप्त भागात असलेल्या शेतीत ते कामे करीत आहेत. अशातच जंगलात जनावरे चारण्याकरिता गेलेल्या एका गुराख्यावर अस्वलासह तिच्या पिलाने हल्ला चढविला. या हल्ल्यात गुराख्याच्या शरीरावरील जखमा पाहून गावकरी धास्तावले असून ती भीती त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे.
माणिकवाडा गावातील गुराखी पद्माकर डाखोळे याच्यावर अस्वलासह तिच्या दोन्ही पिलांनी जोरदार हल्ला केल्याने पद्माकर मृत्यूच्या दारात उभा आहे. शेतामध्ये ठाण मांडून बसलेली अस्वल जंगलातून जाते तोच लगेच शेतात परत येते, वनविभागाचे कर्मचारी दिवसभर तिचा शोध घेत आहे; मात्र त्यांच्या हाती अद्याप काहीच लागले नाही. यामुळे या अस्वलाची दहशत गावात पसरली असून वनविभागाने याकडे लक्ष देत मार्ग काढण्याची मागणी होत आहे.
माणिकवाडा या जंगलव्याप्त गावात जंगली प्राण्यांची नेहमीच ये-जा असते. याची माहिती असताना केवळ वेळ चुकल्याने पद्माकरच्या जीवावर बेतले. तो नेहमीप्रमाणे गुरे घेवून बुधलागड टेकडीच्या मागील परिसरात गेल्या. सूर्यास्ताच्या समयी आपली गुरे घेवून तो घराकडे निघाला. एवढ्यात मागाहून येत अस्वलाने झडप घातली. हिमतीने पक्का असलेला पद्माकर प्रतिकार करू लागला; मात्र तिच्या दोन पिलांनी अक्षरश: पद्माकरचा चेहरा ओरबडून टाकला. पाठीच्या अवयवाचे लचके तोडले. क्षणार्धात सगळ्या घडामोडी झाल्या.
आजूबाजूला कोणीच नसल्याने त्याच किंचाळ्यांचा आवाज कानी पडला नाही. एवढा मोठा हल्ला होवूनही पद्माकरने गावातील एकाला फोन करून सगळी माहिती दिली. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी मिळून जंगलाकडे धाव घेतली. गंभीर अवस्थेत त्याला घरी आणले. याची माहिती पूर्ण गावकऱ्यांना झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती.
या घटनेला आज चार दिवसांचा कालावधी होत असला तरी त्याची भीती गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे. ज्या भागात घटना घडली त्या भागातील एकही शेतकरी त्या जंगलाच्या दिशेने फिरकला नाही.
शिवाय गावात अस्वल येणार तर नाही ना, या चिंतेने गावकरी भयग्रस्त आहेत. ३ हजार ५०० लोकवस्ती असलेल्या गावात अस्वलाने भीती निर्माण केल्याने वनविभागाच्या मागे रक्षण व पहारा करण्याचे काम लागले आहे. १५ जणांची चमू सतत बंदोबस्तावर तैनात आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी. परिहार नागपूरला पद्माकरच्या शस्त्रक्रियेसाठी दवाखाण्यात आहे. त्याचा पूर्ण वैद्यकीय खर्च वनविभाग करणार असून त्याच्या कुटुंबाला शासकीय मदत मिळावी याकरिता वरिष्ठांकडे प्रकरणाचा अहवाल पाठविल्याचे वनविभागाच्यावतीने सांगितले आहे.

 

Web Title: The land of Manikwadas did not touch the farm due to beau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.