भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

By admin | Published: April 13, 2017 01:34 AM2017-04-13T01:34:26+5:302017-04-13T01:34:26+5:30

आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या;

Landowning lands rich and builders' throat | भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

भूदानातील जमिनी श्रीमंत व बिल्डरांच्या घशात

Next

रामदास तडस : भूदान शेतजमिनीतील घोटाळ्याचा प्रश्न लोकसभेत
वर्धा : आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमिनी गरजूंना वाटण्यात आल्या; पण शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्याने त्या तशाच पडून होत्या. त्या जमिनी अधिकारी व भूमाफीयाच्या संगणमताने श्रीमंत व बिल्डरांना विकल्या गेल्यात. भूदानातील जमिनी देशातील भूमिहिन गोरगरीबांना मिळाव्या म्हणून भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीकडे खा. रामदास तडस यांनी लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत प्रश्न विचारून लक्ष वेधले.
देशातील गोरगरीब आणि शेतमजुरांना पोटाची खळगी भरण्यासाठी जमिनीचा तुकडा असावा. तसेच अनेक श्रीमंत लोकांकडे पडून असलेली जमिनी कष्टकऱ्यांना मिळावी, भूमिहिनांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करण्यासाठी आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ राबविली. या चळवळीत मोठी जमीन असणाऱ्या जमीनदारांना जमिनीचे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. देशातील गोरगरीब जनतेकरिता आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ १९५१ पासून प्रारंभ केली. या चळवळीत देशातील लोकांनी २२ लाख ९० हजार एकर जमीन दान केली. पैकी १६ लाख ६६ हजार एकर जमीन देशातील भूमिहिनान्ाां वाटली; पण उर्वरित ६ लाख ३७ हेक्टर जमीन शिल्लक आहे.
महाराष्ट्रात १ लाख ४ हजार हेक्टर जमीन आहे. त्यातील ०.२७ हेक्टर जमिनीचे वितरण झाले असून ७७ हजार हेक्टर जमिनीचे वाटप व्हायचे आहे. भूदानताील जमीन वाटपामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.
आचार्य विनोबा भावे यांची भूदान चळवळ ही भूमिहिन गोरगरीब जनतेलाच जमीन मिळावी म्हणून होती; पण अलिकडच्या काळात अनेक मोठे घोटाळे बाहेर येऊ लागले. याबाबत खा. तडस यांनी लोकसभेत १८ डिसेंबर २०१४ ला अतारांकित प्रश्न व ५ मार्च २०१५ रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता. आज नियम ३७७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करून संसदेचे लक्ष वेधले. वर्धा जिल्ह्यात भूदानची १९८० हेक्टर जमीन असून ११८ हेक्टरचे अद्याप वाटप झाले नाही. अलिकडच्या काळात गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केले तर कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहे, याकडेही खा. तडस यांनी लक्ष वेधले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Landowning lands rich and builders' throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.