जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्राममध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 02:52 PM2018-09-26T14:52:07+5:302018-09-26T14:55:12+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे.

The largest Charkha in the world is in Sevagram | जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्राममध्ये दाखल

जगातील सर्वात मोठा चरखा सेवाग्राममध्ये दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देनव्या सभागृहासमोर करणार स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क

 दिलीप चव्हाण 
वर्धा: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या सुवर्ण जयंती वर्षारंभमहोत्सवात येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम वर्धा मार्गावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर सभागृहाचे काम जलद गतीने सुरू आहे. २०१९ मध्ये १५० वी जयंती आहे. त्यामुळे सुवर्ण जयंती महोत्सवी वर्ष साजरे होणार आहे.
सभागृहाच्या दर्शनी भागावर हा चरखा बसविण्यात आला असून तो जनतेला गांधी जयंतीला पाहायला मिळणार आहे. हा चरखा मुंबईतील जे.जे.स्कूल आॅफ आर्ट महाविद्यालयातील प्रा.श्रीकांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे. ते धातू काम विभागात कार्यरत असून या कामात त्यांना रंग व रेखा काम विभागाचे प्रा. विजय सपकाळ व प्रा. विजय बोंदर यासह बारा विधार्थ्यांनी सहकार्य केले.
प्रा. श्रीकांत खैरनार लोकमत प्रतिनिधीसोबत चर्चा करताना म्हणाले, शासनाने चरख्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली. मोठा चरखा बनवायचा हा विचार होता. दिल्लीच्या विमानतळावरील चरख्यापेक्षा मोठा असावा ही कल्पना मनात ठेवून काम सुरू केले. हा चरखा एम.एस. मध्ये बनविला. त्यामुळे दीर्घ काळ टिकणार आहे. हा १८.६ फूट उंचीचा असून त्याचे वजन ५ टन आहे. चरखा मोटरने सतत फिरत राहणार आहे. फक्त यात सूत कताई होणार नाही. एल.ए.डी. लाईटचा परिणाम साधला असून संगीत आणि भजन पण सुरू राहणार आहेत. हा चरखा बनवण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी लागला. या कामात अनेक अडचणी आल्या पण सर्वांच्या सहकार्याने हे काम यशस्वी केल्याचे खैरनार पुढे म्हणाले. या चरख्यासाठी लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डकडे संपर्क साधणार असून वर्ध्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली.
गांधीजींचा हा चरखा सर्वांना प्रेरणादायी ठरो व त्यांच्या कार्य आणि विचारांचे सतत स्मरण रहावे. हा चरखा जगभरात विख्यात होईल असा विश्वास वाटत असल्याचे ते पुढे म्हणाले.

Web Title: The largest Charkha in the world is in Sevagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.