नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 06:00 AM2019-10-02T06:00:00+5:302019-10-02T06:00:09+5:30
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून नामनिर्देशन अर्जाची उचल सुरु झाली. अर्ज भरण्याकरिता आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पण, त्यामध्ये दोन सुट्या आल्याने आता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याकरिता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यातही उद्याची गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे दोन दिवसच उमेदवारांच्या हाती असल्याने गुरुवार आणि शुक्रवारी नामनिर्देशन भरण्याकरिता उपविभागीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे. यामध्ये हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदार संघात अर्जाची उचल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत वर्धा विधानसभा मतदार संघातून ४४ जणांनी ८० अर्जांची उचल केली. हिंगणघाटमध्ये ४८ उमेदवारांनी ५०, देवळीमध्ये ३२ उमेदवारांनी ८३ तर आर्वी विधानसभा क्षेत्रातून २० जणांनी ६१ अर्जांची उचल केली आहे. या चारही मतदार संघात केवळ आर्वी येथेच एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन भरले आहे. आज नामनिर्देशन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या आठ दिवसाच्या कालावधीपैकी पाच दिवस उलटले आहे.पण, अद्यापही वर्धा, देवळी आणि हिंगणघाटमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही.
उद्याला गांधी जयंतीची सुटी आल्याने दोनच दिवस उमेदवारांच्या हाती आहे. त्यामुळे आज काही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली होती. आता गुरुवार आणि शुक्रवारी पक्षांच्या उमदेवारांकडून शक्तिप्रदर्शनाव्दारे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
निवडणूक काळात सुट्यांचा सप्ताह
निवडणूक कार्यक्रमानुसार २७ स्पटेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत जवळपास सात सुट्या आल्या आहेत. नामांकन अर्ज भरण्याच्या दुसºयाच दिवशी सर्वपित्री अमावश्या, तिसºया दिवशी घटस्थापना आणि सहाव्या दिवशी महात्मा गांधी जयंतीची सुटी आल्याने अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन सुट्यांचा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर ४ आक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून ५ आक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. दुसºया दिवशी रविवार असल्याने ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटा दिवस आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.पण, त्याच दिवशी दसरा असल्याने सुटी आली आहे. प्रचाराकरिता बारा दिवस दिले असून त्यातही दसरा, कोजागिरी पोर्णिमा व संकष्ट चतुर्थी अशा सुट्या आल्या आहे.
१९ ऑक्टोबर या बाराव्या दिवशी प्रचार तोफा थंडावणार असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यानंतर सोमवारी मतदान होणार आहे. दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असून पुन्हा २५ ऑक्टोबरला दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे विजयी उमेदवार यावर्षी निकालांती दिवाळी साजरी करणार आहे. पण, अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पाहोचण्याकरिता उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.
डॉ. पंकज भोयर गुरुवारी दाखल करणार नामांकन
वर्धा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता शिवाजी चौकातून पायदळ मिरवणूक काढून उपविभागीय कार्यालयात ते अर्ज दाखल करतील.