राष्ट्रसंत तुकडोजी मार्केट यार्डवर सोयाबीनच्या खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:31 PM2017-10-17T23:31:29+5:302017-10-17T23:31:40+5:30
कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्केट यार्डमध्ये सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समिती, समुद्रपूर अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मार्केट यार्डमध्ये सोयाबीन खरेदीला सुरूवात झाली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल २ हजार ८०१ रुपये भाव दिल्या जात आहे. खरेदीच्या सुभारंभ प्रसंगी आफताब खान, पप्पु गणी, पांडुरंग बाभुळकर, गणेश गुप्ता, खुशाल लोहकरे, महादेव बादले, प्रभाकर हरदास, मुकूंद सांगाणी, शंकर डहाके आदींची उपस्थिती होती. पहिल्यादिवशी सुमारे ९०० क्विंटलची आवक झाली.
यार्डात प्रथम येणारे शेतकरी विनोद लिलेश्वर वांदीले यांचा अॅड. सुधीर कोठारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उमरी येथील केशव बळीराम पाखरकर व भाऊराव खेकडे यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
अॅड. सुधीर कोठारी यांनी आजच्या घडीत कोणताही व्यापारी धान्य किंवा कापूस घेण्याचा मनस्थितीत नाही. सुरूवात असल्याने २,८०१ भाव मिळाला. तोही हमी भावापेक्षा कमी असल्याची मला जाण आहे. शासनाने शासकीय खरेदीसाठी १८ तारखेपासून आॅनलाईन नोंदणीचे संकेत दिले आहे. आमच्या खरेदी विक्री संघाचा एक कर्मचारी याच बाजार समितीत नोंदणीसाठी बसणार आहे. ज्यांना नोंदणी करायची असेल त्यांनी ७/१२, पेरापत्रक, अंदाजे उत्पन्न दाखवून नोंदणी करून घ्यावी. ज्या शेतकºयाला पैसाची गरज आहे. त्यांनी वेअर हाऊसमध्ये सोयाबीन ठेवून तारण योजनेचा लाभ घ्यावा. हिंगणघाट बाजार समिती दुसºया दिवशी ६५-७० टक्के रक्कम अदा करेल असे त्यांनी सांगितले. शेतकºयांनी आपला शेतमाल केवळ परवानाधारक व्यापाºयांनाच विकावे. परवाना नसणाºया खासगी व्यापाºयाला शेतमाल विकल्यास फसवणुकीची भीती असते असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उपस्थित अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक वांदीले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे सचिव शंकर धोटे यांनी केले तर आभार शांतीलाल गांधी यांनी मानले. कार्यक्रमाला बाजार समितीचे उपाध्यक्ष मनिष निखाडे, महादेव बादले, महेश झोटींग, गंगाधर हिवंज, संजय तुराळे, जीवन गुरनुले, जनार्धन हुलके, गणेश वैरागडे, वसंत महाजन, भागवत गुळघाणे, खविसचे संचालक शांतीलाल गांधी, वामन डंभारे, शालिक वैद्य, केशव भोले, हरिभाऊ बोंबले, रामभाऊ चौधरी, गणेशनारायण अग्रवाल, मेघश्याम ढाकरे, दोंदळ, कमलाकर कोटमकर, अभय लोहकरे, खविसचे मोतीराम जीवतोडे, भूजंग अंड्रस्कर यांच्यासह अडते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता लक्ष्मण वांदीले, राजू काळमेघ, जनार्धन राऊत, विष्णु खुरपुडे, शंकर राऊत, राजू वागदे आदींनी सहकार्य केले.