सर्वांसाठी एक कायदा या धोरणाने वाटचाल
By admin | Published: August 21, 2016 12:28 AM2016-08-21T00:28:52+5:302016-08-21T00:32:54+5:30
कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा प्राप्त झाल्याने येथे दुसरा कोणीही कायम निवासी बनू शकत नाही.
चिपळूण : काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष व राणे समर्थक संदीप सावंत यांनी शनिवारी मुंबई येथे मातोश्री येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भगवा झेंडा खांद्यावर देत त्यांच्या हातात शिवबंध बांधले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम उपस्थित होते. सावंत यांच्याबरोबर काँग्रेसचे माजी नगरसेवक बाळ पड्याळ, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते व माजी सरपंच प्रभाकर जाधव, कौंढरताम्हाणे ग्रामपंचायतीचे सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्य, तसेच प्रभाकर जाधव, श्रीकांत पवार, प्रवीण सावंत, एकनाथ माळी, संजिवनी शिंदे, राजेंद्र खेतले, प्रवीण खेडेकर, सुयोग सुर्वे, शिवराम कांबळे, दिलीप आदवडे, विशाल नरळकर, जयश्री पालांडे, रामचंद्र पंडव, महेंद्र तावडे, मनसेचे प्रमोद सकपाळ, सुनील सुर्वे, दीपक खेडेकर, राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास चव्हाण, मंगेश
चव्हाण, प्रदीप राजेशिर्के, विलास शिंदे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
शनिवारी दुपारी १ वाजता छोटेखानी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवबंधन बांधून तर काही कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे देऊन शिवसेनेत स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे म्हणाले की, ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेत आला आहात तो विश्वास कायम जपला जाईल. तुमचा मान सन्मान राखला जाईल. तुम्ही जोमाने काम करून संघटना वाढवा. संघटना मजबूत करण्याचा ध्यास बाळगून काम करा, असे सांगितले. (प्रतिनिधी)
चौकट
ग्रामपंचायत शिवसेनेकडे
कौंढर ताम्हाणे ग्रामपंचायत माजी सरपंच प्रभाकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. शनिवारी जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील सरपंच चंदन भोबस्कर, उपसरपंच महेंद्र तावडे व सर्व सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसकडे असलेली ही ग्रामपंचायत आता शिवसेनेकडे गेली आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघातील २५० पेक्षा जास्त कार्यकर्ते शिवसेनेत गेल्याने या मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे.
राणेंविरुद्धच्या तक्रारीमुळे चर्चेत
माजी खासदार नीलेश राणे यांनी आपल्याला मारहाण केली असल्याची तक्रार संदीप सावंत यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे राणे व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाली होती. त्यामुळे सावंत चर्चेत आले. यानंतर सावंत यांनी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, शनिवारी त्यांनी सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.
मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे चिपळूण माजी तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना शिवबंध बांधून स्वागत केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख सचिन कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आदी उपस्थित होते.