सुपिक जमिनीवर ले-आऊटचा फलक

By admin | Published: March 27, 2016 02:11 AM2016-03-27T02:11:13+5:302016-03-27T02:11:13+5:30

ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे.

Lay-out panel on a supernatural ground | सुपिक जमिनीवर ले-आऊटचा फलक

सुपिक जमिनीवर ले-आऊटचा फलक

Next

फसवणुकीचा प्रयत्न : अवैध व्यवसाय तेजीत
सेलू : ले-आऊटच्या नावावर लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. धानोली येथेही असाच एक फलक लावण्यात आला असून बुकींगही सुरू केले आहे. वास्तविक, सदर ले-आऊट अद्याप मंजूर नसून एन.ए., टी.पी. मंजूर नसल्याचे समोर आले आहे.
येथून एक किमी अंतरावर धानोली (मेघे) येथे डांबरी रस्त्यालगत मौजा धानोली (मेघे), खसरा नं. १६६/१ जमीन शेतमालकाकडून विकत घेतली. अत्यंत सुपिक असलेल्या या जमिनीवर रात्रीतून ले-आऊट टाकून मधे सिमेंटचे छोटे दगड गाडले. स्वस्त दरात व मासिक किस्तीवर प्लॉट उपलब्ध म्हणून मोठा फलक लावला. एवढेच नव्हे तर परवानगी नसताना, जमीन कृषक असताना एन.ए., टी.पी. असा फलकही लावला. संपर्कासाठी राजेंद्र, अभिजित, सचिन असे आडनाव नसलेली नावे टाकून त्यापुढे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना उघडपणे फसविण्याचा हा प्रकार सुरू आहे. यात यापूर्वी अनेकजण फसले गेले आहे. सेलूतही एका ले-आऊट मालकाने ५० पेक्षा अधिक प्लॉट लोकांना विकले. तेच प्लॉट बँकेला गहाण करून कोट्यवधी रुपये कर्ज घेतले. सदर प्रकरण सेलू पोलिसात दाखल आहे. धानोली येथे तर ले-आऊट मालकाने परवानगी नसताना शेतात अनधिकृत फलक लावला. या ले-आऊट मालकावर महसूल विभागाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lay-out panel on a supernatural ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.