आमदारांनी दिली स्टेट बँक प्रशासनाला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:28 PM2018-08-08T22:28:37+5:302018-08-08T22:29:45+5:30

येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या.

Legislators reprimanded the State Bank of India | आमदारांनी दिली स्टेट बँक प्रशासनाला तंबी

आमदारांनी दिली स्टेट बँक प्रशासनाला तंबी

Next
ठळक मुद्देसेलू येथील शाखेला भेट : बीपीएलधारकाला बँक खाते काढण्यासाठी पॅनकार्डची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या.
येथील स्टेट बँकेत अनेक शेतकऱ्यांचे खाते आहे. त्यांनी पीक कर्जासाठी बँकेकडे प्रकरण सादर केले आहे. पण येथील बँकेचे अधिकारी सागर येवले हे ग्राहकांशी उद्धटपणे बोलून त्यांना पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात अशी तक्रार तालुक्यातील मोहन गुजरकर, दशरथ आत्राम, गंगाधर शेंदरे, नितीन अग्निहोत्री, रामू मुडे, पुरूषोत्तम वैरागडे, दीपक कांबळे, प्रशांत माहुरे यांसह आणखी काही शेतकऱ्यांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली होती. आमदारांनी बुधवारी सकाळी ११ वाजता बॅक गाठून बँकेत उपस्थित प्रभारी अधिकारी उषा उके यांना वरील शेतकºयांच्या पीक कर्जाविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. येत्या आठ दिवसाचे आत सर्व शेतकºयांच्या समस्या सोडवून मला त्याबद्दल माहिती द्या व बँकेत येणाºया प्रत्येकांना सौजन्याची वागणूक द्या अशी तंबी दिल्यानंतर प्रभारी व्यवस्थापक उषा उके यांनी सर्व शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन जनतेसमक्ष आमदारांना दिले.या बँकेचे नियमित ग्राहक असलेले व या बॅकेचे नियमित कर्ज फेडणारे महाबळा येथील शेतकरी मोहन गुजरकर यांना तुम्ही आमच्या बँकेच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे कारण देत त्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे आमदारांनी व्यवस्थापकांच्या लक्षात आणून देताच त्यांची भंबेरी उडाली. असाच काहीसा प्रकार वडगाव येथील ज्येष्ठ नागरिक दारिदय रेषेखालील दशरथ आत्राम यांना बँकेत खाते काढण्यासाठी पॅन कार्डची अट घातल्याची व्यथा आत्राम यांनी आमदारा समोर मांडली असता आमदारांनी पॅनकार्डची गरज तीन लाख रुपयाचे वर उत्पन्न असलेल्या साठीच आहे ही बाब व्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून देत त्यांचे ताबडतोब बँक पासबुक देण्याचे बजावले.
आमदारांच्या बँक भेटीदरम्यान त्यांचे सोबत तालुका भाजपाध्यक्ष अशोक कलोडे, बाजार समितीचे संचालक विलास वरटकर, भाजयुमो अध्यक्ष विकास मोटमवार, चंदू वंजारी, न.प. सदस्य शैलेंद्र दप्तरी आदी उपस्थित होते. याच बॅकेत काही दिवसापूर्वी एका शेतकऱ्याला बॅक अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. सेलू तालुक्यात बॅकांमध्ये शेतकरी व नागरिकांना चांगली सेवा दिली जात नाही त्यामुळे यापूर्वीही आमदारांनी हिंगणी बॅकेत भेट दिली होती.

Web Title: Legislators reprimanded the State Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.