कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोप

By admin | Published: February 14, 2017 01:28 AM2017-02-14T01:28:19+5:302017-02-14T01:28:19+5:30

गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन वर्धा व नागरी आरोग्य केंद्र या संस्थेद्वारा राबविण्यात आलेल्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोपिय कार्यक्रम ....

Leprosy awareness campaign concludes | कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोप

कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोप

Next

समाजातील समज-गैरसमजाविषयी केला ठिकठिकाणी जागर
वर्धा : गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन वर्धा व नागरी आरोग्य केंद्र या संस्थेद्वारा राबविण्यात आलेल्या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेचा समारोपिय कार्यक्रम सोमवारी सिंदी (मेघे)च्या सरपंच सुप्रिया मोहोड यांच्या अध्यक्षतेत पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रंजन सोलंकी, वर्षा पुराणिक, रमाबाई कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पिंपळे, सहसंचालक प्रमोद बहुलेकर, राजेंद्र डोळे, खेडकर यांच्यासह गांधी मेमोरियल लेप्रसी फाउंडेशन व विहान प्रकल्पाचे कार्यकत्यांची यावेळी उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना प्रमोद बहुलेकर यांनी कुष्ठरोग पीडितांशी भेदभाव न करता त्यांना समाजात सन्मानाने जगू दिले पाहिजे असे सांगितले. कुष्ठरोग कसा होतो. तो कसा पसरतो. त्यावरील उपचार व या आजाराविषयी समाजात असणारे गैरसमज यासंबंधीही त्यांनी यावेळी माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान कुष्ठरोगा विषयी माहिती देणारी चित्र प्रदर्शनिही लावण्यात आली होती. या कुष्ठरोग पंधरवड्यात गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशनतर्फे वर्धा बस स्थानक, आंजी (मोठी) येथील बाजारात कुष्ठरोगावर आधारित प्रदर्शनी लावून जनजागृती करण्यात आली.
सदर उपक्रमादरम्यान तीन शहरी व दोन ग्रामीण क्षेत्रात ‘कुष्ठरोग’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. विविध सहा शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणी करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींना कुष्ठरोगाविषयी माहिती देण्यात आली. चार ग्रामसभेत तसेच सात विशेष सभेत महिलांना कुष्ठरोगा संबंधी माहिती देत जनजागृती करण्यात आली.
या विशेष उपक्रमाला सविता वैद्य, गजानन कुराडकर, डॉ. माखिजा, अलका खेडकर, अश्विनी तिमांडे, विद्या सिस्टर, जाहागीर पठाण, तृप्ती थुल, अविनाश व कल्पना काळे, प्रभाकर डोरले आदींचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संचालन कल्पना काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गजानन कुराडकर यांनी मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शहनाज पठाण, राजेंद्र डोळे, संजय चोरटकर आदींनी सहकार्य केले. या कार्यक्रमातून कुष्ठरोगा विषयी जनजागृती करण्यात आली.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Leprosy awareness campaign concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.