कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 11:44 PM2017-11-24T23:44:29+5:302017-11-24T23:44:41+5:30

सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे.

Less response to buying cotton | कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद

कापूस खरेदीला अल्प प्रतिसाद

Next
ठळक मुद्देयंदा पेरा वाढला असला तरी उत्पादनातील घट कायमच

सुधीर खडसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : सध्या तालुक्यात ४ खरेदी केंद्र सुरू आहेत. यात चोरडिया इंडस्ट्रीज नंदोरी, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज जाम, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज जाम व प्रकाश हॉईट गोल्ड उबदा यांचा समावेश आहे. खासगी व्यापारी कापूस खरेदी सुरू असून सीसीआय व कॉटन फेडरेशनची खरेदी मात्र बंद आहे. सध्या शेतकºयांना ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव दिले जात आहे. यावर्षी कापसाच्या पेºयामध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवारपर्यंत २६ हजार १२३ क्विंटलची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात दोन ठिकाणी खासगी खरेदी चालू असून त्यावर मार्केट कमेटीचे कोणतेही नियंत्रण नाही. तालुक्यात कापूस खरेदीला अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे.

अवेळी अधिक पाऊस झाल्यामुळे पहिले येणारे कापसाचे बोंड सडले. बोंडावर किड पडली असून शेतकºयांचा कापूस ‘रेन डॅमेज’ झाला. यामुळे त्याला कमी भाव देण्यात आला. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत कमी प्रमाणात कापूस मार्केटमध्ये आला. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाचा पेरा वाढला आहे. सध्या ४३०० ते ४७०० रुपयांपर्यंत भाव चालू आहे. सध्या आवक नसल्याने कापसाचे भाव वाढले असून आवक वाढल्यावर पुन्हा कापसाचे भाव कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- अभिषेक कोठारी, कनक अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज, जाम.

रूईच्या गाठीमध्ये वाढ नसून सरकीमध्ये मंदी चालू आहे. मागील वर्षी गाठीचे भाव ४४ हजार रुपये होते. यावर्षी ३८ हजार रुपये आहेत. सरकीचे भाव मागील वर्षी २८०० होते. यावर्षी १९०० रुपये आहेत. यामुळे शेतकºयाला हा जो भाव मिळत आहे, त्यापेक्षा अधिक भाव देणे परवडणारे नाही.
- रमाकांत जाजोदिया, सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज, जाम.

मागील वर्षी कापूस वेचाई १२० ते १३० रुपये २० किलोचा दर होता. यावर्षी १७० ते २०० रुपये दर आहे. मागील वर्षीपेक्षा मजुरी २५ टक्क्यांनी वाढली असून उत्पादन घटले आहे. कपाशीवर लाल्या रोग आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
- शफात अहमद पटेल, शेतकरी, कोल्ही.

जंगली जनावरांच्या त्रासाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चिता नक्षत्रात झालेल्या पावसाने बोेंड ओले झाले. यामुळे ‘रेन डॅमेज’ झालेला कापूस ३३०० रुपये भावाने विकावा लागला. बिटी बियाणे भेसळयुक्त मिळाल्याने त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे. या हंगामात कापूस पिकावर अनेक रोगांनी थैमान घातला. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. डिझेल महाग झाल्याने कापूस वाहतुकीचा खर्चही दीड टक्क्याने वाढला आहे.
- कृष्णराव व्यापारी, शेतकरी, रा. वाघेडा.

Web Title: Less response to buying cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.