सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 11:33 PM2017-10-07T23:33:36+5:302017-10-07T23:33:46+5:30

दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते.

 Less than soya bean extract | सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

सोयाबीनचा उतारा खर्चापेक्षाही कमी

Next
ठळक मुद्देअपुºया पावसाचा परिणाम : एकरी चार ते पाच क्विंटल उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्क
विजयगोपाल : दसरा आटोपताच शेतकरी सोयाबीन काढण्याचा कामाला लागले आहेत. मागीलवर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झालेल्या शेतात यंदा एकरी पाच ते सहा क्विंटलच उतारा येत असल्याचे दिसते. अपुºया पावसामुळे सोयाबीनचा उतारा निम्म्यावर आला आहे. यातच मजुरीचे भावही वाढले आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.
विजयगोपाल परिसरात यंदा शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. मृग नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे सोयाबीनची लागवड करण्यात आली; पण त्यानंतर पावसाने दडी मारली. परिणामी, सोयाबीनच्या वाढीवर त्याचा विपरित परिणाम झाला. अनेक शेतकºयांनी ओलित करून सोयाबीन जगविण्याचा प्रयत्न केला. तुषार सिंचनासारख्या पावसावर सोयाबीन वाढविले; पण ऐन फुल धारणेच्यावेळी पावसाने पुन्हा दडी मारली. सुमारे ४० दिवस पाऊस न आल्याने पिकाचा फुलोरा गळून गेला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अळ्यांचा प्रादुर्भाव झाला. या सर्वांचा परिणाम आता उत्पन्नावर दिसून येत आहे. मागील वर्षी ज्या शेतात नऊ ते दहा क्विंटल एकरी उतारा येत होता, तेथे यावर्षी केवळ पाच ते सहा क्विंटल उतारा येत असल्याचे दिसून येत आहे.
दुष्काळामुळे मजुरांनी शहरात स्थानांतरण केले आहे. याचा फायदा घेत गावांतील मोजके मजूर भाव वाढवून घेत आहेत. मागील वर्षी सवंगणीचे दर १४०० ते १५०० रुपये होते. यावर्षी ते १८०० ते २००० रुपयांपर्यंत वाढलेले आहेत. यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात सोयाबीन काढण्याच्या कामाला वेग आला आहे; पण मजुरीचे वाढलेले दर आणि निम्मा झालेला उतारा यामुळे खर्चही निघणार की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय अत्यल्प पावसामुळे रबी हंगामात गहू, हरभरा घेणे कठीण झाले आहे. परिणामी, सोयाबीनची पेरणी करून बहुतांश शेतकरी पश्चाताप करीत असल्याचेच दिसून येत आहे.
बाजारभाव स्थिर
निसर्ग साथ देत नाही आणि बाजारात भाव मिळत नाही, यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. सोयाबीनचे हमीभाव ३०५० आहे. एकरी सोयाबीनला १५ ते १६ हजार रुपये उत्पादन खर्च येतो. सरासरी ५ क्विंटल उत्पादन निघाल्यास जेमतेम उत्पादन आणि खर्च बरोबरीत होतो. यात शेतकºयांच्या हाती काहीच उरणार नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title:  Less than soya bean extract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.