महावितरण उठले शेतकºयांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:23 AM2017-10-29T01:23:27+5:302017-10-29T01:23:54+5:30
कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हितेशी असलेल्याचा दिखाचा करणाºया उर्जा विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे.
कृषी पंपाची जोडणी कापण्याच्या या बडग्यातून बचावाकरिता शेतकºयांना सुरू महिन्याचे देयक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम शेतकºयांना अपेक्षेनुरूप झाला नाही. शिवाय उत्पादनाला मिळणारे दर शेतकºयांना न परवडणारे आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना कुठल्याही रकमेचा भरणा करणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषीपंप धारक शेतकºयांची चिंता वाढली आहे.
खरीप हंगामात उत्पन्न झाले नसल्याने ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांकडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनची कापणी केल्यानंतर रबी हंगामाकरिता शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रबीची पेरणी करण्यापूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याची पद्धत आहे. या सिंचनाच्या कामाची तयारी शेतकºयांनी केली आहे. यात विहिरीत उपलब्ध असलेले पाणी आणि नदी काठावर अथवा शेततळे असलेल्या शेतकºयांनी तेथून मोटारपंप लावून शेतात पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला गती येत असतानाच महावितरणकडून थकबाकीदार कृषीपंप धारकांच्या जोडण्या कापण्याचे फरमान सोडले आहे. यामुळे रबीची तयारी करणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे झाले आहे.
६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचा पेरा संकटात
वर्धा जिल्ह्यात यंदा पाऊस प्रमाणाच्या तुलनेत कमी झाला. यामुळे ओलिताचे क्षेत्र कमी होईल असे वाटत होते. तो अंदाज खरा ठरत आहे. वर्धेत यंदा ६६ हजार २७५ हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात ८० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत वर्षी चन्याला बºयापैकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा चन्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गहू आणि इतर रबी पिके आहेतच.
वर्धेतील ६८,२०१ शेतकºयांकडे ८६.१२ कोटी
वर्धा जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी ८६ कोटी १२ लाख रुपयांवर असल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. असलेली थकबाकी आणि विजेची वाढती मागणी यात सांगड घालण्याकरिता महावितरणच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ हजार कृषी पंप धारकांनी जेव्हापासून जोडणी घेतली त्या काळापासून देयकाचा भरणा केला नाही तर ४८ हजार ग्राहकांनी ज्या गत वर्षभरापासून देयक भरले नाही. एका वर्धा जिल्ह्यात एवढी थबकाकी असताना वीज पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचावाकरिता सुरू वर्षाचे देयक भरणे गरजेचे झाले आहे.