अवैद्य लाकूड तस्करी करणारा ट्रक पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 11:58 PM2017-09-16T23:58:00+5:302017-09-16T23:58:19+5:30
समुद्रपूर वनपरिक्षेत्रात येणाºया मारडा झुडपी जंगलातून बाभळीच्या झाडांची अवैद्य कत्तल करून तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या कर्मचाºयांनी शुक्रवारी जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : समुद्रपूर वनपरिक्षेत्रात येणाºया मारडा झुडपी जंगलातून बाभळीच्या झाडांची अवैद्य कत्तल करून तस्करी करणारा ट्रक वनविभागाच्या कर्मचाºयांनी शुक्रवारी जप्त केला. या प्रकरणी आरोपी लाकूड व्यवसायिक कमलसिंग मीरसिंग बावरी (४०) रा.रूई खैरी जि. नागपूर आणि वाहन चालक फुलसिंग बल्लुसिंग चव्हाण रा. नागपूर या दोघाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, समूद्रपूर वनपरीक्षेत्रातील मारडा झुडपी सर्व्हे क्रमांक ८२ मधील जंगलातील बाभूळ झाडांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी.डी. बाभूळे यांना मिळाली. दरम्यान क्षेत्रसहाय्यक सचिन कापकर आणि वनकर्मचाºयांनी सापळा रचून ट्रक क्रमांक एम. एच. ३१ सी क्यू ५२८६ ताब्यात घेतला. या ट्रक मध्ये अंदाजे सात टन बाभूळीचे लाकूड भरलेले होते. सदर कारवाईत ट्रक आणि लाकूड किंमतीसह साडे सात लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी बी. डी. बाभळे यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक सचिन कापकर, वनकर्मचारी यशवंत बेहते, लंकेश चौके, सुधाकर चौधरी, घनश्याम टाक, चिंतामण लडी, कैलाश जस्वाल यांनी केली.
इतर झुडपी वनातील वृक्षतोड दुर्लक्षित
तालुक्यातील केवळ मारडा या झुडपी क्षेत्रातील वृक्षतोड करून त्याची वाहतूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र, समुद्रपूरच नाही तर इतर झुडपी वनात सुरू असलेल्या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. गत काही दिवसांपूर्वी खरांगणा बिटात मोठी झाडे तोडण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली; मात्र त्यावर काय कारवाई करण्यात आली, हे गुलदस्त्यातच राहिले. याकडे वनविभागाने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.