केंद्र चालकांसह शेतकºयांनाही ‘लिंक फेल’चा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:40 AM2017-09-04T00:40:05+5:302017-09-04T00:40:21+5:30
स्थानिक ग्रामदूत केंद्रामध्ये कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत आहे; पण लिंक फेल होत असल्याने केंद्र चालकांना .......
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/सेवाग्राम : स्थानिक ग्रामदूत केंद्रामध्ये कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी शेतकºयांची गर्दी होत आहे; पण लिंक फेल होत असल्याने केंद्र चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय शेतकºयांनाही लिंक फेलचा फटका बसत असून दिवसभर वृद्ध दाम्पत्यांना ताटकळत बसावे लागत आहे. याकडे लक्ष देत तंत्रज्ञान गतिमान करणे गरजेचे झाले आहे.
सेवाग्राम आश्रम मार्गावर ग्रामदूत केंद्र व तलाठी कार्यालय आहे. राज्य शासनाने शेतकºयांच्या कर्जमाफीची घोषणा करून आॅनलाईन आपली माहिती देण्याच्या सूचना दिल्यात. १५ सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसाठी माहिती भरावयाची आहे. यामुळे शेतकरी आपली सर्व कामे बाजूला ठेवून पत्नीसह केंद्रात ठाण मांडत असल्याचे दिसते. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी याच केंद्रावर येत असल्याने कामाचा ताण वाढला आहे. ग्रामदूत केंद्रात तीन संगणक परिचालक एकाच वेळी काम करीत असले तरी ‘थम्ब मशीन’ एकच असल्याने कामाची गती मंदावली आहे. यातच संपूर्ण राज्यात काम सुरू असल्याने ‘लिंक फेल’चा फटका बसत आहे. मागील चार दिवस लिंकच नव्हती, अशी माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सुटी असताना शेतकºयांसाठी ग्रामदूत केंद्र सुरू करण्यात आले होते. यात २०० ते २५० शेतकºयांची नोंदणी व अर्ज भरण्याचे काम झाले. सुविधा व्हावी म्हणून शेतकºयांना टोकण देणे सुरू केले आहे. यामुळे शेतकºयांचा वेळ वाचणार आहे. शासनाने ‘थम्ब मशीन’ वितरित केल्या; पण या केंद्राला अद्याप अतिरिक्त मशीन मिळाली नसल्याचे सांगण्यात आले. मुदतीच्या आत अर्ज भरण्याची घाई सर्वांनाच झाल्याने गोंधळाचे चित्र आहे.
‘नेटवर्क’मध्ये अडथळ्यांची शर्यत
डिजिटल प्रशासनाचा राज्यभरात गवगवा केला जात असला तरी यंत्रणा किती मजबूत आहे, हे कुणीही तपासताना दिसत नाही. सर्व बाबी आॅनलाईन केल्याचा गाजावाजा शासन, प्रशासनाकडून केला जातो; पण त्यासाठी लागणारे ‘नेटवर्क’ किती ‘स्ट्राँग’ आहे, हे तपासले जात नाही. परिणामी, ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ या म्हणीप्रमाणे सर्वांची स्थिती होत आहे. सध्या कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरत असताना लिंक फेलचा मोठा फटका बसत असल्याचे दिसते. हा प्रकार एकाच गावात नाही तर सबंध जिल्हाभर केंद्र संचालक, तेथील कर्मचारी तथा शेतकºयांना सहन करावा लागत आहे.
एकाच दिवसात काम होईल, याचीही शाश्वती राहत नसल्याने शेतकºयांना तीन ते चार दिवस चकरा माराव्या लागत आहे. कुठे लिंक आहे तर शेतकºयांच्या बोटांचे ठसे येत नाही, कुठे सर्व व्यवस्थित आहे तर आधार कार्ड इनव्हॅलीड दाखवित आहे, असे अनेक अडथळे येत असल्याने कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंदावत असल्याचे दिसते. यासाठी नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.