आर्वीच्या विविध बॅँकांतील लिंक फेल
By admin | Published: September 3, 2015 01:54 AM2015-09-03T01:54:27+5:302015-09-03T01:54:27+5:30
बॅँकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे विविध कामे लिंक असल्याशिवाय होत नाही.
वर्धा : बॅँकांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यामुळे विविध कामे लिंक असल्याशिवाय होत नाही. आर्वी शहरात दोन दिवसांपासून बॅँकांतील लिंक फेल असल्याने विविध बॅँकांतील कामांचा खोळंबा झाला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांसह शेतकऱ्यांवरही होत आहे.
बॅँकांच्या संगणकीकरणानंतर विविध कामे चुटकीसरशी होतील, अशी सर्वसामान्य ग्राहकांना अपेक्षा होती. त्यासाठी बॅँकांचे व्यवहार इंटरनेटशी जोडण्यात आले. पण, इंटरनेटचा वेग आणि बरेचदा त्यामधून निर्माण होणाऱ्या अडचणी बॅँकांसाठी डोकेदुखीच्या ठरू लागल्या आहेत. इंटरनेटला वेगच राहत नसल्याने बॅँकांमध्ये एका कामासाठी कित्येक वेळ प्रतीक्षा करावी लागते. शिवाय लिंक फेल असल्यास कामांचा खोळंबा होतो. लिंक फेल असल्यास ग्राहकांना आजचे काम उद्या करण्याशिवाय पर्यायच राहत नाही. आर्वी शहरातील विविध बॅँकांमध्ये सोमवारपासून ही अडचण निर्माण झाल्याचे समजते.
कार्यालयातील लिंक फेल असल्याने ग्राहकांसोबतच शेतकऱ्यांच्याही कामांचा खोळंबा झाला आहे. लिंक अभावी चालान भरू शकत नसल्याने कामे थांबली आहेत. दोन दिवसांपासून लिंक फेल असताना संबंधित मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. शेतकऱ्यांची कामे खोळंबू लागल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू असून, शेतकऱ्यांना विविध कारणांसाठी बॅँकांमध्ये जावे लागते. लिंक फेल असल्यास शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागते.(तालुका प्रतिनिधी)