बीएसएनएलला पालिकेचे कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:40 PM2018-03-20T23:40:04+5:302018-03-20T23:40:04+5:30

सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला मंगळवारी न.प.च्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 Liquid lock of BSNL | बीएसएनएलला पालिकेचे कुलूप

बीएसएनएलला पालिकेचे कुलूप

Next
ठळक मुद्दे मालमत्ता कर थकविला : पथक पोहोचताच उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला मंगळवारी न.प.च्या अधिकाऱ्यांनी सील ठोकले. मालमत्ता कर थकविल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. पालिकेचे कर वसूली पथक सदर कार्यालय परिसरात पोहोचल्याची माहिती होताच बीएसएनएलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली होती.
बीएसएनएलच्या अधिनस्त असलेल्या सिव्हील लाईन भागातील तीन इमारतींचा अतिरिक्त दंडासह ६४ लाख २३ हजार ९८४ रुपयांचा कर थकला होता. हा कर भरण्याकडे सदर कार्यालयाचे दुर्लक्ष झाले. या कराचा भरणा करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावूनही काहीच कारवाई झाली नाही. यामुळे आज पालिकेच्या करपथकाने दुपारी बीएसएनएल कार्यालय गाठले. यावेळी बीएसएनएलच्या अधिकाºयांना सुचना देऊनही मालमत्ता कर भरण्याकडे होत असलेली टाळाटाळ लक्षात घेता पथकातील थेट बीएसएनएलच्या कार्यालयालाच सील ठोकण्याचा निर्णय घेतला. याची माहिती बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देताच त्यांची एकच तारांबळ उडाली होती. बराच वेळ न.प. अधिकारी व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊनही थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत योग्य निर्णय झाला नाही. अखेर कार्यालयाला सील ठोकले.
यावेळी ज्या इमारतीतून जिल्ह्यातील नागरिकांना बीएसएनएल इंटरनेटची सुविधा पुरविते त्या इमारतीला सोडून कार्यालयाला सील ठोकण्यात आले. ही कारवाई न.प.चे प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, कर विभाग प्रमुख रवींद्र जगताप, अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, चंदन महत्वाने, प्रदीप मुळघाटे, नाना परटक्के, प्रवीण बोबडे, खुशाल तामगाडगे, राजेंद्र शंभरकर, जगदीश गौतम आदींनी केली.
तिसऱ्यांदा सील ठोकण्याची नामुष्की
सिव्हील लाईन भागातील बीएसएनएलच्या कार्यालयाला न.प. अधिकाऱ्यांनी २००४ व २०१७ मध्ये मालमत्ता कराचा भरणा न केल्याने सील ठोकले होते. त्यानंतर झालेल्या तडजोडीअंती सील काढण्यात आले होते. यंदाही मालमत्ता कराची रक्कम अदा न केल्याने तिसऱ्यांदा वर्धा न.प.च्या अधिकाऱ्यांनी बीएसएनएल कार्यालयाला पालिकेचे कुलूप लावले.
कार्यालयातील साहित्य बाहेर काढण्यासाठी धावाधाव
पालिकेचे अधिकारी सील ठोकत असल्याचे कळताच बीएसएनएलच्या कर्मचाºयांची एकच तारांबळ उडाली. वेळ मिळताच कार्यालयातील साहित्य बीएसएनएलच्या बाहेर काढून इतर ठिकाणी ठेवले.

Web Title:  Liquid lock of BSNL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.