देवळीत ८७ हजाराचा दारू साठा व मुद्देमाल जप्त; हायवेवरील कारवाईत दोन आरोपींना अटक
By अभिनय खोपडे | Updated: August 24, 2023 19:50 IST2023-08-24T19:49:53+5:302023-08-24T19:50:42+5:30
दारूविक्रेत्या दोन आरोपींना गजाआड करण्यात आले.

देवळीत ८७ हजाराचा दारू साठा व मुद्देमाल जप्त; हायवेवरील कारवाईत दोन आरोपींना अटक
वर्धा : देवळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हायवे वरील दरबार हॉटेल जवळ साफळा रचून केलेल्या कारवाईत ८७ हजार ५०० रुपयांचा दारू साठा तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूविक्रेत्या दोन आरोपींना गजाआड करण्यात आले.
गुप्त माहितीदारकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळी पोलिसांचे वतीने हायवे वरील दरबार हॉटेल जवळ साफळा रचण्यात आला.यावेळी कळंब कडून वर्धा मार्गे जाणाऱ्या एमएच ३२ एएन ७०३६ क्रमांकाच्या मोटरसायकल ची तपासणी केली असता यामध्ये दारूसाठा आढळून आला.सोबत दारू विक्रेते आरोपी प्रवीण राजू पाटील व स्वप्नील राजू जुनगडे दोन्ही राह. सिद्धार्थनगर, वर्धा मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. या दारू साठ्यात ऑफिसर चॉईस चे १० बंपर किंमत १० हजार, ओसी ब्लू चा दोन लिटरचा बंपर २ हजार ५०० रुपये तसेच ७५ हजाराची मोटरसायकल असा ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस जमादार नितीन तोडासे व कुणाल हिवसे यांनी कारवाई केली.