पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 05:00 AM2022-05-16T05:00:00+5:302022-05-16T05:00:06+5:30

मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

Load of previous arrears recovery; So now the deadline for pre-monsoon work | पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मान्सूनचे आगमन होताच वादळीवारा आणि पावसामुळे बहुधा विद्युत तारा तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसानच सोसावे लागते. हे नुकसान टाळता यावे या हेतूने पावसाळ्यापूर्वी विविध कामे महावितरण हाती घेत असून हीच कामे २० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या थकबाकी वसुलीमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. अशातच आता मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

चार महिन्यांत १८ कोटींची वसूली
- कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली पथके नेमण्यात आली. याच पथकांनी विशेष मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून मागील चार महिन्यांत तब्बल १८ कोटींची थकबाकी वसूल केल्याचे वास्तव आहे. तशी नोंद महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने घेतली आहे.

वसुलीसाठी १३ पथके
-  कोटींच्या थकबाकीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात किमान १३ पथके तयार करण्यात आली असून याच पथकांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात धडक वसुली मोहीम राबविली जात  आहे.  ग्राहकांना आवाहन केले जात आहे.

पथदिवे लावण्याचे काम
- पावसाळा लागण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती गावात अंधार होऊ नये म्हणून पथदिवे लावण्याचे काम हाती घेतात. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. ते गावातील खांबावर दिवे लावून देतात.

पावसाळी कामे कोणती?
- महावितरण मान्सूनपूर्व कामे हाती घेत असून या कामांदरम्यान विद्युत वाहिनीवर आलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जातात. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकलेे असतील ते व्यवस्थित करण्यासह लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. ही कामे करताना खबरदारीचा उपाय म्हणून काही काळाकरिता त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्र त्यावरील भार पाहून बदलविण्याचे कामही केले जाते. वीज पडल्याने इन्सुलेटर उडतात. त्याचा आवश्यक स्टाॅक उपलब्ध करून ठेवावा लागतो.

निम्म्याहून अधिक भागातील कामे पूर्ण
- मे महिन्यांच्या सुरुवातीलाच महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील १३ उपकेंद्रांपैकी निम्म्याहून अधिक भागात पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत. २० मे पर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील ही कामे पूर्ण करण्याचा मानस महावितरणचा आहे.

अन्यथा सोसावे लागते नुकसान
- मान्सूनचे आगमन होताच वादळीवाऱ्यासह पाऊस होतो. अशातच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तुटून बहुधा विद्युत वाहिन्या तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे वेळीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

 

Web Title: Load of previous arrears recovery; So now the deadline for pre-monsoon work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज