जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जपुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 09:20 PM2019-06-30T21:20:15+5:302019-06-30T21:20:26+5:30

शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loan by the District Central Co-operative Bank | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जपुरवठा करावा

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जपुरवठा करावा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : विधानभवनात झाली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून यामुळे शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलढाणा, वर्धा व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणीसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. बुलढाणा, वर्धा आणि नागपूर या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये बीसी मॉडेल सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने दोन दिवसात नाबार्डकडे पाठवावा. नाबार्डने शेतकºयांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेऊन या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी द्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकºयांच्या हितासाठी बँकांची उभारणी करण्यात आली आहे परंतु बँका शेतक ºयांचे हीत न पाहता स्वत: चा व्यवसाय पाहतात हे चुकीचे आहे. या तिन्ही बँकांनी शेतकºयांना तत्काळ कर्जपुरवठा सुरु करता यावा यासाठी अडचणीवर मार्ग काढून राज्य सहकारी बँक आणि नाबार्ड यांच्याशी समन्वय साधावा. बँकांची व नाबार्डची भूमिका ही शेतकºयांना मदत करण्याची असली पाहिजे. जिल्हा बँका अडचणीत असलेल्या ठिकाणी जर शासकीय कार्यालये भाडे तत्वावर असतील तर ती कार्यालये जिल्हा बँकांच्या ताब्यात असलेल्या जागेत स्थलांतर केले तर त्या जागेचा उपयोग होईल आणि बँकांना मदत होईल यासंदर्भातील प्रस्तावाचा विचार करावा, अशाही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. बैठकीला ना. सुभाष देशमुख, आभा शुक्ला आदी हजर होते.

Web Title: Loan by the District Central Co-operative Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.