पोलिसांवर हल्ला करणारा दारूविक्रेता स्थानबद्ध

By admin | Published: September 15, 2016 12:57 AM2016-09-15T00:57:21+5:302016-09-15T00:57:21+5:30

पोलिसांवर सातत्याने होणारे हल्ले, हा मुद्दा राज्यस्तरावर गाजत आहे. वर्धा शहरातील दारूविक्रेत्यानेही एकदा नव्हे तर चारवेळा पोलिसांवर हल्ले केले.

Locating liquor vendor who attacked the police | पोलिसांवर हल्ला करणारा दारूविक्रेता स्थानबद्ध

पोलिसांवर हल्ला करणारा दारूविक्रेता स्थानबद्ध

Next

आदेश पारित : दारू विक्री व वाहतुकीचे अनेक गुन्हे दाखल
वर्धा : पोलिसांवर सातत्याने होणारे हल्ले, हा मुद्दा राज्यस्तरावर गाजत आहे. वर्धा शहरातील दारूविक्रेत्यानेही एकदा नव्हे तर चारवेळा पोलिसांवर हल्ले केले. या दारूविक्रेत्याविरूद्ध स्थानबद्धतेचा आदेश पारित करण्यात आला आहे. ही कारवाई एमपीडीए अ‍ॅक्टनुसार बुधवारी करण्यात आली.
सराईत गुन्हेगार व दारूविक्रेता राजेश उर्फ राजू उर्फ अंडा जगलाल जयस्वाल (४२) रा. नालवाडी हा वर्धा शहर, हिंगणघाट, देवळी, दहेगाव, समुद्रपूर व सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अवैध दारूची विक्री व वाहतूक करीत होता. तो हातभट्टीवाला व धोकादायक व्यक्ती सदराखाली मोडत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी त्याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे याबाबत अधिनियम १९८१ सुधारीत २००९ अन्वये स्थानबद्धतेकरिता प्रस्ताव पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केला होता. यावर सोमवारी आदेश पारित करण्यात आला. आदेशानुसार राजेश उर्फ राजू उर्फ अंडा जगलाल जयस्वाल (४२) यास झोपडपट्टीदादा हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे अधिनियम १९८१ सुधारीत २००९ च्या कलम ३ पोटकलम १ अन्वये एक वर्षाकरिता जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले.
आदेशाच्या अंमलबजावणीसाठी शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या युद्ध स्तरावर मोहीम राबवित त्याचा शोध घेतला. त्याला वर्धा शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात एमपीडीए अ‍ॅक्ट अन्वये जिल्हा दंडाधिकारी यांचा प्राप्त स्थानबद्धता आदेश मराठी व इंग्रजीमध्ये संपूर्ण कागदपत्रांसह तामील केला गेला.े
जिल्ह्यात दारूबंदी असल्याने अवैध दारूविक्रेत्यांच्या व्यवसायावर आळा घालण्यास्तव प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करून पोलिसांनी कठोर कार्यवाही करण्यास सुरूवात केली आहे. अवैध व्यावसायिकांवर यापूढेही एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याची कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, अचल मलकापुरे, एस.बी. कडू, वर्धा पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी केली.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Locating liquor vendor who attacked the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.