आश्रमातील बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 05:00 AM2020-04-25T05:00:00+5:302020-04-25T05:00:09+5:30

गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बनविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांनासुद्धा सोईचे झालेले होते.

 Lockdown hit Bapu Daptar in the ashram | आश्रमातील बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

आश्रमातील बापू दप्तरला लॉकडाऊनचा फटका

Next
ठळक मुद्देनिर्धारित कालावधीपेक्षा लागतोय अधिक वेळ : सारवणाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे ज्या कार्यालयातून हलत असे, त्या बापू दप्तरच्या नूतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधीपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याची सद्यस्थिती आहे.
गांधीजींनी आश्रमची स्थापना केल्यानंतर आपल्या विचारांना प्रत्यक्ष साकार करण्याचा प्रारंभ केला. आश्रमातील आदी निवासमधूनच बापू कार्य करीत होते. मात्र, कालांतराने गरजेनुसार कुटी तयार करण्यात आल्या. यातील बापू कुटीच्या बाजूच्याच मीरा बहन यांच्या कुटीलाच दप्तर बनविण्यात आले. बापू आणि दप्तरमध्ये कार्य करणाऱ्यांनासुद्धा सोईचे झालेले होते.
कालौघात कुटी झुकल्याने धोका होऊ नये म्हणून आश्रम प्रतिष्ठानने विचार विनिमयातून नूतनीकरणाचा निर्णय घेतला. तब्बल ८२ वर्षांनी कार्यालय नूतनीकरणाचा योग आला. ऐतिहासिक असल्याने अभ्यासपूर्वक आणि कुशल सुतार आवश्यक होते. योगायोगाने ते उपलब्ध असल्याने कामाला डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात झाली.
मार्चमध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, कामे अत्यंत बारकाईची असल्याने कालावधी वाढू लागला. यातच कोरोना आणि नंतर लॉकडाऊनचा परिणाम येथील कामावर झाला.
आश्रमातील नियमित कर्मचारी माती आणि सारवणाचे अंतिम टप्प्यातील कामे करीत आहेत. दरवाजे तयार आहेत. सध्या तरी लॉकडाऊन ३ मे पर्यंत आहे. पुढे वाढतो का? हा प्रश्न आहे. यामुळे तज्ज्ञांनाही आश्रमात येऊन पाहणी करता येत नसल्याने महत्त्वाची कामे खोळंबली आहेत. फ्लोअरिंंगचे काम झाल्यावरच साहित्य ठेवण्यात येईल. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागेल.

Web Title:  Lockdown hit Bapu Daptar in the ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.