महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 05:00 AM2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:24+5:30

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते.

Lockdown hits Maharashtra Jeevan Pradhikaran's coffers | महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

Next
ठळक मुद्देकोरोनायन । पाणी देयकापोटी ६० लाखांची वसुली खोळंबली

सुहास घनोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणााच्या वसुलीला मोठा फटका बसला. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडे तब्बल ६० लाखांची देयके थकली.
शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी देयक प्रिंटिंग आणि वितरणाचा कंत्राट नागपूर येथील गणेश इंजिनिअरिंग या कंपनीला दिला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने वर्ध्यापूर्वी नागपुरात लॉकडाऊनसह संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली.
त्यामुळे जीवन प्राधिकरणाची पाणी बिले प्रिंट होण्यात आणि पर्यायाने वितरणातही अडथळा निर्माण झाला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्राधिकरणानेही वसुलीला या दोन महिन्यांच्या कालावधीत थांबा दिला.
मजिप्राला दरमहा पाणीपुरवठ्याच्या देयकापोटी सरासरी ३० लाखांचा महसूल प्राप्त होतो. दोन महिने सर्व काही ठप्प असल्याने तब्बल ६० लाखांची वसुली थकली. लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणल्याने सुरू महिन्यापासून नियमित पाणी देयके वितरित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली.

देयकासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावा
कोरोना विषाणू संसर्गाचे सावट कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देयकाकरिता कार्यालयात येणेच गरजेचे नाही. देयक भरणा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ऑनलॉईन प्रणाली आहे. या माध्यमातून ग्राहकांना पाणी देयक अदा करता येणार आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Lockdown hits Maharashtra Jeevan Pradhikaran's coffers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.