महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Published: June 30, 2016 02:13 AM2016-06-30T02:13:36+5:302016-06-30T02:13:36+5:30

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुसुंद्रा येथील नऊ जण गंभीर जखमी झाले, शिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास ...

Locked to the office of MSEDCL | महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

Next

शिवसेनेचे आंदोलन : सुसुंद्रा घटनेचा निषेध, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा आरोप
आष्टी (शहीद) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुसुंद्रा येथील नऊ जण गंभीर जखमी झाले, शिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे म्हणत वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयाला शिवसेनेच्यावतीने कुलूप ठोकण्यात आले. सदर घटना मंगळवारी घडली असून माहिती होताच उपअभियंता शरद डेकाटे यांनी कार्यालयात हजेरी लावत झालेल्या चर्चेअंती प्रकरण निवळले.
सुसुंद्रा येथील नऊ शेतकरी व मजूर शेतात काम करताना त्यांना विजेचा धक्का बसला. जखमी शेतकऱ्यांवर वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याने भेट देखील दिली नाही. लोंबकळणाऱ्या तारा आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कंपनी नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी यावेळी केला.

अधिकारी कार्यालयातून बेपत्ता

आष्टी (श.) : सुसुंद्रा येथील घटनेचा जाब विचारण्यासाठी सहायक अभियंता कार्यालयात आल्यावर उपअभियंता शरद डेकाटे, कनिष्ठ अभियंता काकडे व इतर कार्यालयीन कर्मचारी गैरहजर होते. याचा निषेध नोंदवित शिवसेना जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कुलूप ठोकून कार्यकारी अभियंता गायकवाड यांना माहिती दिली. याची माहिती होताच डेकाटे कार्यालयाजवळ आले.
कुलूप ठोकल्याने या कार्यालयाची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी झालेल्या चर्चेत दोषींवर कारवाई करण्याच्या आश्वासनावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: Locked to the office of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.