Lok Sabha Election 2019; ६.७६ लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:31 PM2019-04-12T21:31:04+5:302019-04-12T21:32:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वर्धा लोकसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २ लाखांवर मतदारांच्या संख्येत वाढ झाली ...

Lok Sabha Election 2019; 6.76 lakh voters read the ballot | Lok Sabha Election 2019; ६.७६ लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

Lok Sabha Election 2019; ६.७६ लाख मतदारांची मतदानाकडे पाठ

Next
ठळक मुद्देदोन लाख मतदार वाढले; पण राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्यांचा टक्का घसरला!

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धालोकसभा निवडणूक २०१४ च्या तुलनेत यंदा तब्बल २ लाखांवर मतदारांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरूवारी झालेल्या मतदानादरम्यान चक्क ६.७६ लाख मतदारांनी मतदान करण्याकडे पाठ दाखविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
निवडणूक विभागाने मतदानाचा टक्का वाढावा तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने ठिकठिकाणी मतदार नोंदणी कार्यक्रमासह जनजागृती केली. त्याचाच परिणाम म्हणून वर्धा लोकसभा मतदारक्षेत्रात यंदा सुमारे २ लाख १४ हजार ५५२ मतदारही वाढले. हे नवीन मतदार आणि जुने मतदार गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून निश्चितच मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढवेल, असा अंदाज निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना होता. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी तब्बल ६ लाख ७६ हजार १२२ मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याकडे पाठच दाखविल्याचे वास्तव आहे. उल्लेखनीय म्हणजे, मतदानाचा दिवस असलेल्या गुरुवारी शासकीय कार्यालयांसह शाळा व महाविद्यालयांना पूर्ण दिवसाची सुटी तर खासगी कंपन्या आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये काम करणाºया कामगारांना दोन तासाची सुटी मतदानासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या आदेशान्वये देण्यात आली होती. मात्र, मतदानाची टक्केवारी शहरी भागात वाढली नाही. वर्धा शहरातही अत्यल्प प्रमाणात मतदान झाले. सर्वांत कमी मतदान वर्धा क्षेत्रातच झाले.

मतदानाचा टक्का घसरण्याची कारणे
केंद्रीय निवडणूक आयोगाने व्होटर स्लिप पाठविण्याचे काम बीएलओ मार्फत केले जाईल असे जाहीर केले होते. शहरी व ग्रामीण भागात बीएलओंनी व्होटर स्लिप प्रभावीपणे वाटल्याच नाही. त्यामुळे मतदारांना आपले मतदान कोठे आहे, यादीचा अनुक्रमांक काय आहे, आदी बाबी माहीत नव्हत्या. मतदान केंद्रावर गेल्यावर ते विविध ठिकाणी चौकशी करीत होते. मात्र, त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अनेक मतदार परत गेले. याचा फटका टक्केवारीला बसला.
महिनाभरापूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांवेळी मतदान केंद्र व आताचे मतदान केंद्र याच्यातही बºयाच ठिकाणी बदल झाले. ग्रामपंचायतीच्या वेळी असलेला यादीतील मतदाराचा अनुक्रमांक लोकसभा निवडणुकीच्या वेळी बदलला त्यामुळे अनेकांना नव्या यादीत नाव कुठे आहे याची माहिती झाली नाही. त्यामुळे ते मतदान न करताच परतले.
वर्धा लोकसभा क्षेत्रात गुरुवारी तापमान ४१ अंशांच्या आसपास होते. त्यामुळे मतदार घराबाहेर पडले नाही. जे पडले त्यांना यादीत नाव सापडले नाही. काहींनी अ‍ॅप वरून नावे शोधली. या सर्व गडबडीत अनेकांना मतदानापासून वंचित रहावे लागले.
प्रशासनाने मार्च महिन्यात नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी २ आणि ३ मार्चला विशेष मोहीम राबविली होती. यात नोंदणी केलेले अनेक नाव मतदार यादीत आलेच नाही. त्यामुळे याचा फटका प्रत्यक्ष मतदानावर पडला.
ग्रामपंचायत निवडणुकीच्यावेळी ज्या पद्धतीने मतदारांना राजकीय पक्षांकडून मतदानाबाबत घरोघरी जाऊन आवाहन केले जात होते. त्या पद्धतीने या निवडणुकीत काम राजकीय पक्षांनीही केले नाही. त्यामुळे जे मतदार स्वत:हून केंद्रापर्यंत आलेत त्यांनीही मतदान केले.
समन्वयाचा अभाव?
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील निवडणूक पारदर्शी होत मतदानाचाही टक्का वाढावा या हेतूने येथे निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आदींची नियुक्ती करण्यात आली. परंतु, निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी तसेच त्याखालील अधिकारी यांच्यात प्रत्यक्ष काम करताना समन्वयाचा अभाव राहिल्याने यंदा मतदानाचा टक्का घसरल्याची चर्चा सध्या शासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
३.५७ टक्क्यांनी घसरण
२०१४ लोकसभा निवडणुकीदरम्यान १५ लाख २७ हजार ८९८ मतदारांपैकी ६४.७५ टक्के मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले होते. परंतु, यंदा १७ लाख ४१ हजार ९०० मतदारांपैकी केवळ १० लाख ६५ हजार ७७८ मतदारांनी मतदान केले. यंदा मतदानात ३.५७ टक्क्यांनी घसरणच झाली.

Web Title: Lok Sabha Election 2019; 6.76 lakh voters read the ballot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.