Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:17 PM2019-04-07T21:17:20+5:302019-04-07T21:17:58+5:30

आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Lok Sabha Election 2019; Congress manifesto is 'Made in Pakistan' | Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

Next
ठळक मुद्दे सिंदी (रेल्वे) येथील सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील, तर विरोधी पक्षाचे उमेदवार चारूलता टोकस यांना भेटायला १०९२ कि. मी. गुडगावला जावे लागेल. आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ सिंदी रेल्वे येथील झेंडा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, नगराध्यक्ष संगीता शेंडे, जि. प सदस्य विजय आगलावे, किशोर शेंडे, विनोद लाखे, किशोर दिघे, योगेश फुसे, किशोर भांदककर, सुधाकर घवघवे, पळसगावचे सरपंच धीरज लेंडे इत्यादी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांची मांडवस. मांडवसीच्या दिवशी जो माणूस चांगले काम करतो, त्याला पुन्हा कामावर ठेवल्या जाते, जो काम करीत नाही, त्याला कामावरून काढल्या जाते. रामदास तडस यांनी पाच वर्षांत विकासाची चांगली कामे केली आहे. त्यांना एक्स्टेंशन द्यायचं, ११ तारखेला मत देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवायचे, अशी साद त्यांनी मतदारांना घातली.
या प्रसंगी उमेदवार रामदास तडस यांनी आपण पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढा मतदारांपुढे वाचला. ५५ वर्षांत झाले नाही ते काम ५ वर्षात करून दाखविले. सिंदीमध्ये ड्रायपोर्ट, उड्डाणपूल, आदी अनेक विकासकामे या मतदारसंघात केली. वर्धा जिल्ह्यात राव घराण्याने ४८ वर्षे राज्य केले. परंतु विकास मात्र कुठे दिसलाच नाही. काँग्रेसला उमेदवारसुद्धा मिळणे मुश्किल होते, काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, गरीबी हटली, मात्र काँग्रेस नेत्यांची, सामान्य माणसाची नाही. वर्ध्याचा विकास पुन्हा जोमात करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन तडस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश राठी यांनी केले. पंकज पराते यांनी आभार मानले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Congress manifesto is 'Made in Pakistan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.