Lok Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 08:27 PM2019-04-08T20:27:27+5:302019-04-08T20:30:07+5:30

वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारात थेट लढत आहे.

Lok Sabha Election 2019; Deoli Vidhan Sabha constituency of Wardha district is of repute | Lok Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा

Lok Sabha Election 2019; वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदार संघ प्रतिष्ठेचा

Next
ठळक मुद्देआर्वीत गणित काळेंवर अवलंबून कुणावार, जगताप, भोयर, बोंडे, केचे प्रचारात मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारात थेट लढत आहे. मात्र या लढतीत काही गावे अंत्यत निर्णयक ठरणारी आहे. याच गावावर लोकसभा निवडणुकीचा निकालही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या गावांवर आता अंतिम टप्प्यात उमेदवारांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये देवळी विधानसभा मतदार संघ अंत्यत महत्वाचा की-पॉर्इंट आहे. या मतदार संघात आ. रणजीत कांबळे हे आमदार आहेत. त्यामुळे चारूलता टोकस यांच्या येथून अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी ते कामाला लागले आहे. मात्र या मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची पूर्ण साथ कॉँग्रेसला मिळण्याची शक्यता दिसत नाही. मात्र प्रभाताईराव यांची कर्मभूमी असलेल्या या भागात जातीचाही मोठा आधार उमेदवारासाठी ‘आधार’ आहे. याशिवाय आर्वी विधानसभा मतदार संघात कॉँग्रेसचा आमदार आहे. त्यांना स्वत:ला आपण या मतदार संघात प्रबळ आहो, हे दाखविण्याची या निवडणुकीच्या निमित्ताने संधी आली आहे. त्यामुळे त्यांनी चारूलता टोकस यांचा प्रचार सुरू केला आहे. या भागात बसपा उमेदवार शैलेश अग्रवाल हे स्थानीक असल्याने ते येथे मत घेण्याची शक्यता आहे. हत्तीने मुसंडी मारल्यास कॉँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी स्थिती आहे. शिवाय भाजपच्या प्रचारात येथे केचे, दिवे असे डबल इंजिन काम करीत आहे. त्यामुळे या मतदार संघाच्या मताधिक्यावर सर्वांची नजर आहे. २०१४ मध्ये भाजपने येथून आघाडी घेतली होती. ती आघाडी आता वाढतेय काय? याकडे अनेकांचे लक्ष आहे. वर्धा विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवाराला जातीचा फायदा सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. कॉँग्रेसचा प्रचार येथे तगडा असला तरी कॉँग्रेसला या मतदार संघात बरेच पाणी तोडावे लागणार आहे. हिंगणघाट विधानसभा मतदार संघात भाजपचे आ. समीर कुणावार यांचा दांडगा जनसंपर्क भाजपची सर्वाच मोठी जमेची बाजू आहे. नाराजांची संख्या अंत्यत कमी आहे. शिवाय राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रचंड वाद आहे. शिवसेनेचे नेते अशोक शिंदे भाजपसोबत आल्याने येथे कॉँग्रेसला आघाडीची शक्यता कमी आहे. मात्र धामणगाव (रेल्वे) मतदार संघात कॉँग्रेसचे आमदार विरेंद्र जगताप यांचा जनसंपर्क व स्वभाव या त्यांच्या जमेच्या बाजू आहे. त्यांचा फायदा कॉँग्रेस उमेदवाराला होईल. येथे त्यामुळेच मताधिक्याची आशा आहे. मोर्शीमध्ये गेल्या वेळपेक्षा यावेळी भाजपची मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. सेनेची चांगली साथ भाजपला आहे.

तीन उमेदवारांचे होल्ड असलेले हे आहेत प्रमुख विभाग, गाव
रामदास तडस यांना २०१४ च्या निवडणुकीत सव्वा दोन लाखांची आघाडी मिळाली होती. सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. कॉँग्रेसपेक्षा अधिक मताधिक्य त्यावेळी भाजपला होते. त्यामुळे भाजप ५ लाखांवर पोहचू शकला.
चारूलता टोकस या पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात आहे. त्यांच्या मताधिक्यासाठी त्यांचे मावस बंधू आ. रणजीत कांबळे यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यांच्या देवळी विधानसभा मतदान क्षेत्रावर साऱ्यांच्या नजरा आहे. येथे त्यांना मताधिक्याची आशा आहे.
शैलेश अग्रवाल बसपाच्या हत्तीवर स्वार झाले आहे. वर्धा जिल्ह्यात काही गावे असे आहेत की त्या ठिकाणी बसपाचे परंपरागत मतदार आहे. प्रत्येक निवडणुकीत बहुजन समाज पक्ष तेथे बाजी मारतो. यात पुलगावचाही समावेश आहे.
२००९ मध्ये दत्ता मेघे निवडून आले होते. त्यांना विविध मतदारसंघांमध्ये चांगली आघाडी होती. त्यामुळे भाजपचा पराभव झाला.
२०१४ मध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या मतदार संघात पक्षाला मते मिळाली नाहीत. त्यामुळे पराभव झाला होता.

Web Title: Lok Sabha Election 2019; Deoli Vidhan Sabha constituency of Wardha district is of repute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.