Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:37 PM2019-03-28T22:37:59+5:302019-03-28T22:38:41+5:30

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

Lok Sabha Election 2019; Public awareness on less polling stations | Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

Next
ठळक मुद्देटक्केवारी वाढविण्यावर भर : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रीय पक्षांसह नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष व अपक्ष अशा एकूण १६ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले होते. ते सर्व नामांकन अर्ज वैध ठरविले असून गुरुवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले असून ती यादी मान्यतेकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत असून मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती.
निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पुरेशा कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मशीन हाताळण्याचे दुसरे प्रशिक्षण पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहे. तसेच निवडणूक कार्यात असलेले व इतरही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनी मतदानाचा अधिकार बजवावा याकरिताही नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सोबतच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता २ डीवायएसपी, ६ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाचे तीन तुकड्या तैनात राहणार आहेत. एका तुकडीत ३० जवानांचा समावेश असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.
मतदानापूर्वीच झाली ईश्वरचिठ्ठी
एरव्ही मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी साधारणत: ईश्वरचिठ्ठी करून उमेदवाराच्या भाग्याचा फैसला केला जातो. परंतुल, आज दोन उमेदवारांनी एकाच निवडणूक चिन्हाची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिल्यानंतर नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हाची निवड करायची होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी व आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे या दोघांनीही एकाच चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या ईश्वरचिठ्ठीत गाढवे यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह देण्यात आले तर वंजारी यांना दुसरे चिन्ह दिले.

Web Title: Lok Sabha Election 2019; Public awareness on less polling stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.