Lok Sabha Election 2019; नेमबाज व कुस्तीपटूत रंगणार वर्धेचा लोकसभा आखाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 09:11 PM2019-04-05T21:11:30+5:302019-04-05T21:12:14+5:30
वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. रामदास तडस हे प्रख्यात कुस्तीपटू असून १९६८ मध्ये तडस यांनी नागपूर केसरीचा पुरस्कार पटकाविला. १९७६, १९७८, १९८०, तसेच १९८२ नंतर सलग ४ वेळा त्यांनी कुस्तीचा विदर्भ केसरी पुरस्कार पटकाविला आहे. ते मागील १८ वर्षापासुन राज्य कुस्तीगीर परिषदेचे सल्लागार आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार अॅड. चारूलता टोकस या रायफलमध्ये राष्ट्रीय नेमबाज आहेत. १९८५ ते १९९१ या कालावधीत त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाजी केली. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळाले आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा या दोन क्रिडा पटूंमध्ये सध्या वर्धा लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहेलवान असलेल्या रामदास तडस यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आता यावेळी दोन क्रिडापटूमधील लढतीत कोण बाजी मारतो. हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.