Lok Sabha Election 2019; १७.४२ लाख मतदार बजावणार आज हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:56 PM2019-04-10T21:56:42+5:302019-04-10T21:57:55+5:30

निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत.

Lok Sabha Election 2019; Today's claim to play 17.42 lakh voters | Lok Sabha Election 2019; १७.४२ लाख मतदार बजावणार आज हक्क

Lok Sabha Election 2019; १७.४२ लाख मतदार बजावणार आज हक्क

Next
ठळक मुद्देपोलिंग चमू रवाना : १५ हजार नवमतदारांचे प्रथम मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत. विशेष म्हणजे यंदा १५ हजार २७२ नवमतदार असून ते पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहेत. बुधवारी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील तालुकास्थळावरून निवडणूक साहित्य घेऊन पोलिंग चमू नियोजित ठिकाणी रवाना झाल्या.
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी ही एकूण सहा विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १५ लाख २७ हजार ८९८ मतदार होते. तर यंदाच्या वेळी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने ही संख्या २ लाख १४ हजार ५५२ ने वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा १८ ते १९ वयोगटातील १५ हजार २७२ तर वयाचे शतक पार केलेले ९८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून त्यात ८ लाख ९३ हजार ७३० पुरुष, ८ लाख ४८ हजार ७०१ स्त्री तर १९ इतर मतदार आहेत. प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा
एकूण २०२६ मतदार केंद्रांवरून गुरूवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आवश्यक माहिती जाणून घेत निवडणूक विभागाने १ हजार २२५ ठिकाणी व्हीलचेअर ठेवण्याचे नियोजन केले आहे. याचा लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे.
जऊरवाड्याला पोलिंग चमू दुपारी पोहोचली
वर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि वर्धा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जऊरवाडा (खुर्द) येथे लोकसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने बुधवारी तालुका स्थळावरून निघालेली पोलिंग चमू दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोहोचली. तेथे दिव्यांग व इतर मतदारांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
प्रत्येक केंद्रावर राहणार दोन स्वयंसेवक
वृद्ध, दिव्यांग अशा मतदारांना मतदान करताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक मतदार केंद्रावर दोन स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण २०२६ मतदार केंद्र असून १४ ते १७ वयोगटातील स्काऊट गाइडचे स्वयंसेवक गुरूवारी सेवा देणार आहेत.

मतदान प्रक्रियेसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोई-सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरूवारी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा.
- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

Web Title: Lok Sabha Election 2019; Today's claim to play 17.42 lakh voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.