Lok Sabha Election 2019; मतदारांनी आपल्या अधिकाराचा जपून अन् जाणीवपूर्वक वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:09 PM2019-04-10T22:09:01+5:302019-04-10T22:10:31+5:30
मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मतदार जागृक असेल तर तो राष्ट्रविकासासाठी योगदान देऊ शकतो. त्यामुळे आपल्या अधिकाराचा जपुन आणि जाणीवपूर्वक वापर करावा. मताधिकार हा मोठा अधिकार आहे. हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. शिवाय त्याचा परिणामकारक वापर केला पाहिजे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजयकुमार पाटकर यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा सत्र न्यायालयाच्या सभागृहात आयोजित मतदार जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला विधीसेवा प्राधिकरणचे सचिव निशांत परमा, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एन. जी. सातपुते, जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक वाडकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक खतीब आदींची उपस्थिती होती.
मतदारांमध्ये जनजागृती करण्याकरिता जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समिती अंतर्गत मतदार जागृती मंच तयार करण्यात आला आहे. या मंचाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचे यावेळी विजयकुमार यांनी सांगितले.
मतदान हा मौलिक अधिकार प्रत्येक मतदारांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक राष्ट्रहिताकरिता आहे. परिणामी, आपल्या मतदान अधिकाराचा वापर प्रत्येक मतदाराने केला पाहिजे. तसेच प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तींचे नाव मतदान यादीमध्ये नोंदविले पाहिजे. एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव असल्यास इतर ठिकाणच्या मतदार यादीमधील नाव कमी करुन कोणत्याही एका ठिकाणीच मतदार यादीमध्ये ठेवावे. मयत, मृत मतदाराचे नाव मतदार यादीतून कमी करून घ्यावे, असे निशांत परमा यांनी याप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.