Lok Sabha Election 2019; भाजप-सेना युतीच्या विजयासाठी प्रयत्न करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 11:47 PM2019-04-07T23:47:30+5:302019-04-07T23:48:34+5:30
हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले.
भाजपा-शिवसेना व रिपाइंचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथील कटारिया भवनात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
मेळाव्याला उमेदवार रामदास तडस, महिला शिवसैनिक सुधा शिंदे, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, राजू खुपसरे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुणोत, मुन्ना त्रिवेदी, मिलिंद भेंडे आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीसोबत ताळमेळ बसत नसल्याची बाब पुढे आली होती. यात प्रामुख्याने अशोक शिंदे यांचा या लोकसभा प्रचार मोहिमेत कुठेही मोठा सहभाग दिसून येत नाही, असेदेखील बोलले जात होते. मात्र, या मेळाव्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आले आहेत.
लोकसभेची निवडणूक ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी बूथ कार्यकत्यार्पासून पदाधिकारी व शिवसैनिक तसेच युवा सैनिक यांनी एकत्रित येऊन ११ तारखेपर्यंत एका-एका मतासाठी कसोशीने प्रयत्न करावे, उमेदवार तडस यांना निवडून आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण प्रयत्न करीत राहावे, असे सांगितले. खासदार तडस यांनी यावेळी शिवसैनिकांच्या अनेक रखडलेल्या कामांना सोडविण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षांत केला असल्याचे सांगितले.
यापुढेही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सेवेत राहील, असे आश्वासन दिले. सभेला चंदू पंडित, रवी लडी, प्रमोद भटे, रवी चव्हाण, निखिल वाघ, किशोर भांदक्कर, जयश्री चौके, अमोल गायकवाड, भारत चौधरी, गणेश इखार, किशोर बोकडे, मंदाबाई चौधरी, करुणा वाटकर, संगीता कडू, नगरसेवक श्रीधर कोटकर यांच्यासह हिंगणघाट व समुद्रपूर परिसरातील शिवसनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहागडकर लागले प्रचारात
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर देवळी व आर्वी विधानसभा मतदार संघात कामाला लागले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी यांना सोबत घेवून ग्रामीण भागात प्रचारसभा घेण्यावर त्यांचा जोर आहे. याशिवाय गावागावांत मतदारांशी संपर्क करून त्यांना युतीला मतदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत.