देश चालवायला ५६ पक्ष नाही, ५६ इंची छाती हवी'; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:15 PM2019-04-01T12:15:38+5:302019-04-01T12:17:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने 56 पक्षांना एकत्र आणलं आहे. मात्र  देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला

Lok Sabha elections 2019 - CM Devendra Fadanvis criticized Congress NCP | देश चालवायला ५६ पक्ष नाही, ५६ इंची छाती हवी'; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली

देश चालवायला ५६ पक्ष नाही, ५६ इंची छाती हवी'; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांची खिल्ली

googlenewsNext

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने 56 पक्षांना एकत्र आणलं आहे. मात्र  देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाकडूनवर्धा येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टार्गेट केले. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेली अनेक वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने विदर्भावर अन्याय केला. मात्र मोदींमुळे विदर्भावरील अन्याय दूर झाला. विदर्भाच्या पुत्राला मुख्यमंत्री बनवलं, विदर्भातील अनेक पुत्रांना मंत्री बनवलं, विदर्भात 15 वर्षात जे आघाडी सरकारकडून विकास झाला नाही तेवढा विकास आम्ही या 4 वर्षात विदर्भात केला आहे.त्यामुळे विदर्भातील सर्व 10 जागा युतीच जिंकणार आणि काँग्रेस-राष्ट्रवादी सुपडा साफ करणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसने देशाला 50 वर्ष एप्रिल फूल बनवलं 
काही देशांमध्ये आज एप्रिल फूल दिवस साजरा केला जातो, मात्र गेली 50 वर्ष काँग्रेसने देशाला एप्रिल फूल बनवलं आहे, आता लोकांना तुम्ही एप्रिल फूल बनवू शकत नाही अशी खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची उडवली

त्याचसोबत मागील निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांची सभा वर्धा येथूनच झाली होती. वर्धाची भूमी महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं काँग्रेसला विसर्जित करा, नरेंद्र मोदींनी वर्धा येथूनच काँग्रेस विसर्जित करण्यास सुरुवात केली. आज काँग्रेस लोकसभेत, विधानसभेत, जिल्हा परिषदेत एवढचं नाहीतर ग्रामपंचायतीत काँग्रेसला विसर्जित करण्याचं काम भाजपाने केलं असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदी यांचा उल्लेख प्रधान चौकीदार, चौकीदार रावसाहेब दानवे, मंचावर उपस्थित असलेले चौकीदार तसेच भर उन्हात प्रधान चौकीदारांचे भाषण ऐकण्यासाठी समस्त चौकीदार असा उल्लेख केल्याने भाजपाकडून चौकीदार या शब्दाची मोहीम आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचं दिसून आलं.  
 

Web Title: Lok Sabha elections 2019 - CM Devendra Fadanvis criticized Congress NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.