लोहार समाजाच्या समस्या लोकसभेत मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 09:06 PM2018-12-25T21:06:36+5:302018-12-25T21:06:49+5:30
लोहार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण सोबत असून विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेला दादा इदाते आयोग लागु करण्यासाठी संसदेत आवाज उठवून या समाजाला न्याय देण्यास सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. पिपरी (मेघे) येथील बाबाराव मेघे यांच्या मालकीचे मैदानावर वैदर्भीय गाडीलोहार, तत्सम जाती महासंघ, नागपूर व जिल्ह्यातील लोहार समाजाचे वतीने ८ वे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लोहार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण सोबत असून विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेला दादा इदाते आयोग लागु करण्यासाठी संसदेत आवाज उठवून या समाजाला न्याय देण्यास सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. पिपरी (मेघे) येथील बाबाराव मेघे यांच्या मालकीचे मैदानावर वैदर्भीय गाडीलोहार, तत्सम जाती महासंघ, नागपूर व जिल्ह्यातील लोहार समाजाचे वतीने ८ वे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावणे होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. अधिवेशनाला प्रमुख पाहुणे माजी आमदार राजु तिमांडे, राष्टÑीय विमुक्त भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, माजी न्यायाधिश द.रा. सम्राट, नगराध्यक्ष अतुल तराळे, ग्रा.पं. सदस्य डॉ. विद्या कळसाईत, सुधीर पांगुळ, सुरेश दिशागज, लोहार समाजाचे अध्यक्ष सदाशिव हिवलेकर, महासंघाचे माजी अध्यक्ष, रा.दा. सुर्यवंशी, संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, स्वागताध्यक्ष दिनकर धानोरकर, आनंद अंगलवार, कोषाध्यक्ष एम.बी. पडघन, राजेंद्र कळसाईत, प्रल्हाद गोलाईत, राजु बढिये हजर होते. याप्रसंगी दादा इदाते यांनी ‘इदाते’ आयोगाच्या शिफारशीबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत हा आयोग लागू करण्यासाठी लोहार समाजासह सर्व दुर भटक्या विमुक्त जमातींनी एकसंघपणे शासन प्रशासनावर दबाव आणून घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.
अधिवेशन समितीचे अध्यक्ष एस.एन. शेंडे यांनी अधिवेशनामागची भूमिका विषद केली. एस.एफ. मांडवकर यांनी संपादीत केलेल्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थी सत्कार व उपवरवधू मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश मांडवगडे यांनी केल्यानंतर उपस्थित वर-वधूनी आपल्या भावी आयुष्यातील जोडीदाराबाबत अपेक्षा व्यक्त करून आपण लग्नास सज्ज असल्याचे परिचयातून दर्शविले. यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातुन आलेल्या कलावंतांनी एकाहून एक कला सादर करीत सरस नृत्य तथा कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश चंदनकर, रमेश चंदनकर यांनी तर समारोप शामराव काळभांडे व आभार अनिल मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर धानोरकर, किशोर छापेकर, आशिष घुग्घुसकर, प्रभाकर कांबळे, रमेश चंदनकर, पंकज बावणे, देवराव तांदुळकर, मोहन धानोरकर, नरेंद्र सोनटक्के, किशोर हंसकार, निलेश धानोरकर, दत्ता चौधरी, सुभाष मोहनकर, चंदु शेलवट, गणेश वाघ, अंकुश बावणे, शिला धानोरकर, नंदिनी छापेकर, वैशाली सावरकर, आर.जी. वाघमारे, मेसेकर आदिंनी प्रयत्न केले.