कापूस उत्पादकांची लूट

By Admin | Published: January 24, 2015 10:58 PM2015-01-24T22:58:35+5:302015-01-24T22:58:35+5:30

जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना

Loot of cotton growers | कापूस उत्पादकांची लूट

कापूस उत्पादकांची लूट

googlenewsNext

३,४०० ते ३,८०० रुपये क्विंटलने खरेदी
वर्धा : जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव अत्यल्प दरात कापूस विक्री करीत आहेत. जिल्ह्यातील काही बाजार समितीत शुक्रवारी ३ हजार ३०० तर ३ हजार ४०० रुपये क्विंटलच्या दरात कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यामुळे कापूस उत्पाकांना मोठा आर्थिक फटका असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद होताच बाजारात व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी सुरू झाल्याने सीसीआय व कापूस व्यापारी यांच्यात मिलिभगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.
यंदाच्या हंगामात सीसीआय व पणन महासंघ यांच्यात सख्य झाले. दोन्ही एजन्सी शासनाच्या असताना पणन महासंघाला सीसीआचा सबएजन्ट म्हणून काम करावे लागले. ज्या ठिकाणी सीसीआयचे केंद्र नव्हते अशाच ठिकाणी पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले. या केंद्रावर कापूस उत्पादक फिरकलेही नाही; मात्र सीसीआयच्या केंद्रावर मिळत असलेल्य हमीभावामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस या केंद्रावर नेला. अशात गत तीन चार दिवसांपासून जागेचे कारण काढत सीसीआयने कापूस खरेदी बंद केली. यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. बाजारात आलेला शेतकरी सीसीआयची खरेदी बंद असल्याने आल्या पावली परत जावे लागत आहे. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून भाव कमी करीत कापूस खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय रोख रकमेचे कारण काढत व्यापारी आणखी दर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामुळे सीसीआयची खरेदी सुरू करण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)
७शेतकऱ्यांवर आल्या पावली परत जाण्याची वेळ
शेतकरी त्यांच्या परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वा इतर ठिकाणी असलेल्या सीसीआयच्या केंद्रावर कापूस घेवून गेल्यावर सीसीआयची खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती दिली जाते. आधीच अडचणीत असलेला शेतकरी त्याचा असलेला कापूस घवून घरी परत आणण्यापेक्षा मिळेत त्या दरात तो विकण्याचा निर्णय घेत आहे. याचा लाभ व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे.
सीसीआयला हवा नवा कापूस
शेतकऱ्यांकडे असलेला कापूस हा दुसऱ्या वेचणीचा आहे. पहिल्या वेचणीचा कापूस शेतकऱ्यांकडून केव्हाच विकल्या गेला आहे. यामुळे बाजारात येत असलेला कापूस खरेदी करण्यास सीसीआय नकार देत आहे. सीसीआयचा हा नकार व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे सीसीआय व व्यापारी यांच्यात साटेलोटे असल्याचा प्रत्यय येत आहे.

Web Title: Loot of cotton growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.