बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:12 PM2017-10-21T23:12:48+5:302017-10-21T23:12:59+5:30
कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे.
फनिंद्र रघाटाटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणा : कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. पण सध्या हा कायदा धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतकºयांची लूट होत असल्याचे दिसत आहे.
कापूस व सोयाबीन खरेदी करताना शेतमालाची प्रत खराब असल्याचे कारण सांगून लुटणाºया व्यापाºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व संचालकांचे संरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नजरेसमोर खासगी व्यापारी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची आर्थिक लुट करीत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.
सोयाबीन प्रति क्विंटल ३०५० व कापसाला प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भाव शेतकºयांना अजिबात परवडणारा नाही. पण शेतकºयांजवळ कोणताच पर्याय उरला नाही. शेतमाल घरी आल्याने तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकण्यासाठी आणत आहे. सध्या चांगल्या सोयाबीनला २४०० ते २५०० रुपये व्यापारी देत आहे. यात शेतकरी प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी नागविल्या जात आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यावर हेच सोयाबीन व्यापारी जवळच्या शेतकºयांच्या नावावर ३०५० रुपयांनी विक्रीसाठी केंद्रावर नेईल.
काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकतीच आवारात खासगी व्यापाºयांनी बाजार समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. या शुभारंभाच्या दिवशी कापसाला व्यापाºयांनी ३७०० ते ४०३१ भाव देवून कापूस उत्पादकांची बोळवण केली. सदर प्रकार बाजार समितीच्या संचालकासमोर घडत आहे. वास्तविक पाहता सध्या समितीत विक्रीसाठी येणारा कापूस सितादहीचा कापूस आहे. तो कापूस प्रतवारीने खराब असूच शकत नाही. फक्त तो परतीच्या मानून पावसाने ओला झाला आहे. शेतकºयांनी तो वाळवून बाजारात आणला तरी पण काही ओलावा कापसात राहतो. हे मान्य केले तर प्रति क्विंटल १ ते २ किलो ओलावा तुट कापून हमीभावाने कापूस खरेदी करणे न्यायोचित असून या प्रकारातून खरेदी अपेक्षित आहे.