पाण्यासाठी लूट
By admin | Published: April 2, 2015 02:03 AM2015-04-02T02:03:53+5:302015-04-02T02:03:53+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे २००७ पासून ११ गावांना पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली;
वर्धा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे २००७ पासून ११ गावांना पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली; पण शासनाच्या राजपत्रात नमूद दर न आकारता मनमानी बिल देण्यात आले़ २००७ पासून सुरू असलेल्या या प्रकारात जनतेकडून तब्बल पाच कोटी रुपये अधिकचे उकळण्यात आले़ ही रक्कम जनतेला परत करणे गरजेचे झाले आहे़
ग्राहक मंचाचाही दणका
पाणी देयकातील ही तफावत वासुदेव राठोड यांनी शोधून काढली़ ही बाब त्यांनी ग्राहक मंच वर्धा, राज्य माहिती आयोग नागपूर यांनाही पटवून दिली़ सर्वांनी ही बाब मान्य केली़ ग्रामीण पाणी दर ५.२५ रुपये असताना वसुली ११.२० रुपये दराने केली़ हा फरक साधारण पाच कोटी असून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने अकरा गावांतील नागरिकांना परत करावा, असा आदेशही ग्राहक मंचाने दिला.